फटो रॅपमध्ये ...यशश्री कॉम्पिटिशन झोनतर्फे शिबिरनागपूर : स्पर्धा परीक्षांची माहिती करून देण्यासाठी यशश्री कॉम्पिटिशन झोनतर्फे म्हाळगीनगर येथे नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २३ ऑगस्टला करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी होती. पदवीनंतर शासकीय नोकरीच्या संधी, त्याचा कोर्स आणि परीक्षेची तयारी, यावर सुशांत भगत यांनी मार्गदर्शन केले. पदवीनंतर खासगी नोकरीच्या शोधात युवकांचा ओढा पुणे-मुंबईकडे वाढला आहे. मिळेल ती नोकरी करण्यासाठी ते तत्पर आहेत. पण सध्या शासकीय क्षेत्रात प्रचंड जागा उपलब्ध आहेत. विशेषत: बँकिंग क्षेत्रात अधिकारी आणि क्लार्क पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येत आहे. इतर परीक्षांच्या तुलनेत बँकिंग परीक्षांचा अभ्यासक्रम हा इतर स्पर्धा परीक्षांच्या तुलनेत सोपा आहे. विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीत जावे, असे आवाहन भगत यांनी केले. शासकीय नोकरीबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज त्यांनी शिबिरात उदाहरणे देऊन दूर केले. कोर्सची माहिती, अभ्यासाचे नियोजन व अचूक मार्गदर्शन असेल तर विद्यार्थी उत्तम कामगिरी करू शकतो आणि शासकीय नोकरी मिळवू शकतो, असे त्यांनी सांगितले. ही संस्था १६ वर्षांपासून कार्यरत आहे. बँकिंग क्षेत्रात ४१ हजार जागा भरण्यात येणार असून, अर्ज करण्याची अखेरची तारीख १ सप्टेंबर आहे. अक्षय सहकारीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कारनागपूर : अक्षय सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांच्या इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार संस्थेच्या २४ व्या वार्षिक साधारण सभेत अध्यक्ष अविनाश डाखोळे यांच्या हस्ते करण्यात आला. सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येत आहे. सभेत उपाध्यक्षा कल्पना भुजाडे, सचिव नरेंद्र पेठे आणि संचालक रामशंकर दिवटे, हरिदास डेलीकर, प्रदीप सूरकार, विठ्ठल येरपुडे, दादाराव गायकवाड, युवराज सुतोने, प्रभाकर बेतीवार, वंदना धनमारे, लेखाविषयक सल्लगाार भानुदास व्यवहारे, कायदेविषयक सल्लागार ॲड. संजय डोईफोडे, ॲड. राजेंद्र बोमेवार, सरव्यवस्थापक एस.व्ही. सहारे, व्यवस्थापक शैलेंद्र कऊटकर, संस्थेचे कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
वाणिज्य पा ... यशश्री कॉम्पिटिशन ..
फोटो रॅपमध्ये ...
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:12+5:302015-08-27T23:45:12+5:30
फोटो रॅपमध्ये ...
