वाणिज्य पा ...१ .
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:19+5:302015-02-14T23:52:19+5:30

वाणिज्य पा ...१ .
>फोटो आहे... रॅपमध्ये....भारतात स्मार्ट फोनच्या विक्रीत वाढनागपूर : यावर्षीच्या जानेवारी महिन्यात इंटेक्स टेक्नॉलॉजीच्या विक्रीत वाढ झाली असून ६.५ लाख उपकरणांची विक्री केली. गेल्यावर्षी अखेरच्या तिमाहीत कंपनीने विक्रीत प्रचंड वाढ नोंदवित १७ लाख उपकरणे विकली. गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण स्मार्टफोनकडे वळले आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेत कंपनीने किफायत दरातील संशोधनात्मक उत्पादने दाखल केली. त्याचा व्यवसाय वाढीसाठी फायदा झाला. कंपनीच्या स्मार्टफोन कलेक्शनमध्ये ॲक्वा ३जी आणि ॲक्वा वाय२ आणि ॲक्वा पॉवरफोनचा समावेश असून ग्राहकांची मागणी आहे. इंटेक्स टेक्नॉलॉजीचे मोबाईल व्यवसाय प्रमुख बिझनेस संजयकुमार कलिरोना यांनी सांगितले की, निरंतर संशोधन आणि नवनवीन उत्पादने बाजारात उपलब्ध केल्यामुळे भारतात हे यश गाठता आले. या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. तंत्रज्ञानात ही उत्पादने सरस असल्याने विक्रीत निरंतर वाढत होत आहे. बातमी आज महत्त्वाची ...इंडस्ट्रीज एक्स्पोचा आज अखेरचा दिवसनागपूर : इन्दोर इन्फो लाईन प्रा.लि.चा तीन दिवसीय इंडस्ट्रीयल एक्स्पो (इंडेक्स्पो) रेशिमबाग मैदानावर ५० हजार चौरस फूट जागेत सुरू असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार, १५ फेब्रुवारी एक्स्पोचा अखेरचा दिवस आहे. देशातील १०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांनी आपली उत्पादने प्रदर्शित केली आहेत. सिम्फोनी, आर.आर. इस्पात, पायलट मशीन, बॉश, टीआयडीसी, कार्बोरॅण्डम युनिव्हर्सल, इन साईज, गाला सिंक, बालाजी इंजिनीअरिंग कोलकाता, सिम्फोनी कुलर्स, ब्रीज एअर कूलर्स, एस.ए. फील्ड, स्ट्रक्चराईट, एलकॉम इंटरनॅशनल आदी कंपन्यांचा समावेश आहे. एक्स्पोमध्ये १५० पेक्षा जास्त कोटींच्या व्यवसायाची शक्यता आहे. ऑटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग, स्विचगिअर, गिअर्स व पंप, वेल्डिंग उपकरणे, फार्मा मशीनरीज, मटेरियल्स हॅडलिंग इक्विपमेंट, हॅण्ड टूल्स, पॉवर टूल्स, कटिंग टूल्स, कन्स्ट्रक्शन मशीन व मेन्टेनन्स उपकरणांची माहिती एक्स्पोमध्ये पहिल्यांदा मिळणार आहे. उपकरणांच्या बुकिंगवर सवलत आहे. एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन (हिंगणा) आणि बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हे सहप्रायोजक आणि मार्गदर्शक आहेत. इन्दोर इन्फोलाईनतर्फे नागपूरसह पुणे, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, रायपूर, इंदूरसह आणि देशातील १० मोठ्या शहरांमध्ये इंडस्ट्रीयल एक्स्पोचे आयोजन केले आहे.