हवरखेड: गत महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाला प्रसन्न करण्यासाठी येथील मुस्लीम बांधवांनी शुक्रवार, ११ जुलै रोजी सामूहिक प्रार्थना करून अल्लाहची करुणा भाकली. पावसाळा सुरू होऊन जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यातील दुसरा आठवडाही निरंक गेल्यामुळे हिवरखेड परिसरातील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाले आहेत. शेतकर्यांनी महागडी बियाणे, खते खरेदी करून पेरणीची तयारी केली; मात्र पाऊसच न बरसल्यामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पेरणीच न झाल्यामुळे शेतमजुरांच्या हातालाही काम उरले नाही. त्यामुळे शेतमजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी हिवरखेड येथील दोन ते अडीच हजार मुस्लीम बांधव बगाडा नाला परिसरातील ईदगाहवर गोळा झाले व तेथे त्यांनी सामूहिक नमाज अदा केली. (प्रतिनिधी) 12सीटीसीएल24
पावसासाठी मुस्लीम बांधवांची सामूहिक प्रार्थना
हिवरखेड: गत महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाला प्रसन्न करण्यासाठी येथील मुस्लीम बांधवांनी शुक्रवार, ११ जुलै रोजी सामूहिक प्रार्थना करून अल्लाहची करुणा भाकली.
By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:23+5:302014-07-12T22:06:23+5:30
हिवरखेड: गत महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाला प्रसन्न करण्यासाठी येथील मुस्लीम बांधवांनी शुक्रवार, ११ जुलै रोजी सामूहिक प्रार्थना करून अल्लाहची करुणा भाकली.
