2 प्टेंबर रोजी कामगार संघटनेंचा संपपणजी : भाजपा सरकार सर्वसामान्य नागरिक आणि कामगार विरोधी धोरण अवलंबित आहे. या धोरणाचा विरोध करण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकरण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कामगार संघटना या बंदला पाठिंबा देत असल्याचे शुक्रवारी गोवा कामगार संघटनांच्या प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले.मेक इन इंडियाच्या नावाखाली विदेशातील औद्योगिक वसाहती भारतात येण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे. विदेशी कंपन्यांनी भारतात व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारने कामगार कायदे बदलावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे मोदी सरकार कामगार कायद्यात दुरुस्ती करुन कामगार विरोधी धोरण अवलंबविण्यास शोधत असल्याचा आरोप आयटक गोव्याचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. या आंदोलनात खासगी कामगार संघटना, कदंबा महामंडळ, रिक्शा टॅक्सी असोसिएशन, बँक कर्मचारी, वीमा कर्मचारी, जलस्त्रोत खाते कर्मचारी, वीज खाते कर्मचारी, खाणग्रस्त नागरिक , युवा इत्यादींचा समावेश असणार असल्याचे फॉन्सेको यांनी सांगितले. यावेळी कामगार संघटनेचे नेते अजितसिंग राणे, सुदीप ताम्हणकर, अँड. सुहास नाईक, बाप्पा कोरगांवकर, मास्कारेन्हास, वासुदेव आर्लेकर व इतर संघटनेनेचे अध्यक्ष उपस्थित होते.
2 सप्टेंबर रोजी कामगार संघटनेंचा संप
2 सप्टेंबर रोजी
By admin | Updated: August 1, 2015 01:11 IST2015-08-01T01:11:29+5:302015-08-01T01:11:29+5:30
2 सप्टेंबर रोजी
