मनोज गडनीस, मुंबई
सोन्याची आयात रोखण्याच्या दृष्टीने आणि देशातील पडूून असलेल्या सोन्याचे चलनवलन करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘अशोकचक्रा’चे डिझाईन असलेली सोन्याची नाणी आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली असली तरी, या व्यवहारातील सुलभता लक्षात घेता काळ्या पैशाला या माध्यमातून पाय फुटतील असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
भारतीयांची सोन्याची हौस हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखीचा मुद्दा असल्याने जेटली यांनी यावर तोडगा म्हणून ‘गोल्ड मॉनिटायझेशन’ योजना अर्थात, बँकेत सोने ठेवून त्यावर व्याज देण्याची योजना जाहीर केली. याचसोबत ‘अशोकचक्रा’चे डिझाईन असलेली सोन्याची नाणी सरकार बाजारात आणेल अशी घोषणा केली. पण, याच दोन योजनांचा खुबीने वापर केला तर त्याद्वारे काळा पैसा फिरविण्यास वाव आहे. एका तज्ज्ञांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत मिळणारी नाणी ही बँका व पोस्ट कार्यालयातूनच उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्राहकांना परवडतील अशा वजनामध्ये ही नाणी येतील. अर्थात, १ ग्रॅमपासून किमान २५ ग्र्रॅमपर्यंत ही नाणी असतील. आजच्या घडीला ५० हजार रुपये किंवा त्यावरील सोन्याच्या खरेदीसाठी पॅन कार्ड सक्तीचे आहे. मात्र पोस्टामध्ये तर अशी कोणतीही व्यवस्था नाही. ‘किसान विकास पत्रा’प्रमाणेच या नाण्यावर ग्राहकाचे नाव असणार नाही. त्यामुळे ५० हजार रुपये किमतीच्या आतील नाणी वेगवेगळ्या खात्यांद्वारे वा पोस्टातून ग्राहकाला थेट विकत घेता येतील.
ही नाणी खरेदी करून ती बँकांतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या ‘गोल्ड मॉनिटायझेशन’ योजनेत गुंतवणूक करून त्यावर व्याजही घेऊ शकतो.
काळ्या पैशांसाठी नाण्यांचा ‘सुवर्ण’मार्ग
सोन्याची आयात रोखण्याच्या दृष्टीने आणि देशातील पडूून असलेल्या सोन्याचे चलनवलन करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘अशोकचक्रा’चे डिझाईन असलेली सोन्याची नाणी आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात
By admin | Updated: March 2, 2015 05:06 IST2015-03-02T02:45:50+5:302015-03-02T05:06:03+5:30
सोन्याची आयात रोखण्याच्या दृष्टीने आणि देशातील पडूून असलेल्या सोन्याचे चलनवलन करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘अशोकचक्रा’चे डिझाईन असलेली सोन्याची नाणी आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात
