नवी दिल्ली : देशभरातील निम्म्या औष्णिक विद्युत केंद्रांकडे आठवडाभर पुरेल इतकाच कोळशाचा साठा हाताशी असल्याने नजीकच्या काळात विजेच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावली आहे. २०१२ च्या मध्यात २२ राज्यांत अभूतपूर्व वीज कपातीला सामोरे जावे लागले होते. त्यापेक्षाही कमी साठा असल्याचे आकडेवारी सांगते.
गुरुवारी गुजरातमधील विद्युत प्रकल्पात अचानक उत्पादन कमी झाल्याने ऐन मागणीच्या काळात ९ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा झाला, असे गुजरातच्या वीज वितरण केंद्राच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.
एखादे वीज वितरण केंद्र कोलमडले, तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आपत्ती व्यवस्थापक कौशल्याबाबत शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण २४ तास वीजपुरवठा होणारे गुजरात हे पहिले राज्य असल्याचे सांगत मोदी यांना सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविता आला.
कमी पावसामुळे जलविद्युत केंद्रातील निर्मितीत घटल्याने टंचाई जाणवत आहे. त्यामुळे सरकारने कोळशावर आधारित वीज केंद्रांना वीजनिर्मिती वाढविण्यास सांगितले, असे औद्योगिक सूत्रांनी म्हटले आहे. भारताला विजेसाठी कोळशावर अवलंबून राहावे लागते; परंतु कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यास कोल इंडिया सक्षम नसल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोळशाचा साठा आठवडाभरापुरताच
देशभरातील निम्म्या औष्णिक विद्युत केंद्रांकडे आठवडाभर पुरेल इतकाच कोळशाचा साठा हाताशी असल्याने नजीकच्या काळात विजेच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावली आहे.
By admin | Updated: August 30, 2014 03:44 IST2014-08-30T03:44:24+5:302014-08-30T03:44:24+5:30
देशभरातील निम्म्या औष्णिक विद्युत केंद्रांकडे आठवडाभर पुरेल इतकाच कोळशाचा साठा हाताशी असल्याने नजीकच्या काळात विजेच्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता बळावली आहे.
