अोला: शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण व कचर्याचे ढीग उचलण्यासाठी मनपा आयुक्तांनी तयार केलेल्या स्वच्छता आराखड्याची ऐन स्वच्छता अभियानाच्या कालावधीतच ऐसीतैशी झाली. दिवाळीच्या दुसर्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र समोर आले. केळीची पाने, झेंडूची फुले, प्लास्टिक पिशव्या, आतषबाजी झालेल्या फटाक्यांचा खच ठिकठिकाणी साचून होता. शहरात घाणीने गच्च भरलेल्या नाल्या-गटारे व ठिकठिकाणी साचलेल्या कचर्याच्या समस्येला अकोलेकर वैतागले आहेत. शहराच्या विविध भागात दहा-दहा दिवस कचरा उचलला जात नसल्याचे रडगाणे आहे. हाच कित्ता ऐन सणासुदीच्या दिवसातही गिरवल्या जात आहे. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीमध्ये शहरात कचरा व मुख्य रस्त्यावर माती साचल्याचे चित्र आहे. सकाळी रस्त्याची झाडपूस केल्यानंतर माती जमा न करता, दुभाजकालगत लहान-लहान ढीग केले जातात. ही परिस्थिती कायम आहे. दिवाळीच्या दुसर्याच दिवशी अकोला क्रिकेट क्लब मैदान ते टॉवर चौक ते मदनलाल धिंग्रा चौक ते थेट गांधी रोड, सिटी कोतवाली ते लोखंडी पूल, सिटी कोतवाली ते टिळक रोड, जुना भाजी बाजार, जनता भाजी बाजार, जुने शहरातील शिवाजी नगरस्थित भाजी बाजार परिसराची स्थिती फार केविलवाणी असल्याचे समोर आले. बॉक्स... सर्वकाही हवेत कारभारसफाई कर्मचार्यांची दैनंदिन ड्यूटी लावणे, त्यांच्याकडून साफसफाई करून घेण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर आहे. स्वच्छता निरीक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड यांची नियुक्ती करण्यात आली असून, यासंदर्भात प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.फारूख शेख व त्यानंतर उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांनी सूचना जारी करणे क्रमप्राप्त आहे. शहराचे एकूणच किळसवाणे चित्र पाहता, मनपाचा कारभार हवेत सुरू असल्याचे दिसत आहे.
स्वच्छता अभियानाला ठेंगा मुख्य रस्त्यांवर साचला कचरा
अकोला: शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण व कचर्याचे ढीग उचलण्यासाठी मनपा आयुक्तांनी तयार केलेल्या स्वच्छता आराखड्याची ऐन स्वच्छता अभियानाच्या कालावधीतच ऐसीतैशी झाली. दिवाळीच्या दुसर्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र समोर आले. केळीची पाने, झेंडूची फुले, प्लास्टिक पिशव्या, आतषबाजी झालेल्या फटाक्यांचा खच ठिकठिकाणी साचून होता.
By admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:03+5:302014-10-24T23:12:03+5:30
अकोला: शहराच्या कानाकोपर्यात साचलेली घाण व कचर्याचे ढीग उचलण्यासाठी मनपा आयुक्तांनी तयार केलेल्या स्वच्छता आराखड्याची ऐन स्वच्छता अभियानाच्या कालावधीतच ऐसीतैशी झाली. दिवाळीच्या दुसर्या दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र समोर आले. केळीची पाने, झेंडूची फुले, प्लास्टिक पिशव्या, आतषबाजी झालेल्या फटाक्यांचा खच ठिकठिकाणी साचून होता.
