Lokmat Money > बिझनेस न्यूज > फॅशनिस्टा प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

फॅशनिस्टा प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

(१० बाय २)

By admin | Updated: July 31, 2015 23:55 IST2015-07-31T23:55:06+5:302015-07-31T23:55:06+5:30

(१० बाय २)

Citizen's response to the Fashnista exhibition | फॅशनिस्टा प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

फॅशनिस्टा प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद

(१
० बाय २)
फॅशनिस्टा प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद
नागपूर : फॅशन आणि लाईफ स्टाईल क्षेत्रातील सुप्रसिद्ध फॅशनिस्टा प्रदर्शनाची सुरुवात रामदासपेठमधील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ३१ जुलैपासून झाली असून हे प्रदर्शन २ ऑगस्टपर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात प्रदर्शन भरविण्याचे फॅशनिस्टाची ही २२ वी वेळ आहे. हे प्रदर्शन रायपूर, लखनौ, सुरत, राजकोट, विशाखापट्टणम, पुणे, मुंबई, कोल्हापूर, कोईम्बतूर, नाशिक, कानपूर, जमशेदपूर, जबलपूर, डेहराडून, इंदोर, मंगलोर, कोचीन, बिलासपूर, वाराणशी, औरंगाबाद, भिलाई येथे भरविण्यात येते. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळात हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. यात महिलांसाठी आधुनिक डिझाईन्स उपलब्ध आहेत. प्रदर्शनात विविध प्रकारचे ब्रॅण्ड ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात एकूण ८० स्टॉल्स आहेत. प्रदर्शनात साजन सजनी, रिन्स क्रिएशन, चेफॉन डिजिटल प्रिंट, डिझायनर बॅग उपलब्ध आहेत. समर्पण फॅशन अँड यु वाराणशीच्या आकर्षक साड्या, रुद्राक्ष कोलकाता आणि गुंज डिझायनर हबचे विविध प्रकारच्या फॅशन व ज्वेलरीचा समावेश आहे. यात प्रदर्शनातील स्टॉल्स धारकांना रोजगार उपलब्ध करून देणे, मेट्रो सिटी आणि इतर शहरातील दुरावा कमी करणे हा उद्देश आहे. प्रदर्शनात कोलकाता, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, बनारस, जयपूर, अहमदाबाद, चंदीगड येथील डिझायनर उपलब्ध आहेत. यात विविध फॅशनचे कपडे, साड्या, लेहंगा, घागरा, सुट, कुर्ती, वेस्टर्न वेअर, किड्स प्रोडक्ट, ॲसेसरीज, आर्टिफिशियल, होम डेकोर, लाईफस्टाईल प्रोडक्टचा समावेश आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Citizen's response to the Fashnista exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.