Lokmat Money > बिझनेस न्यूज > रसायनीत पथदिवे बंद असलयने नागरिकांत भीती

रसायनीत पथदिवे बंद असलयने नागरिकांत भीती

मोहोपाडा-रसायनी : मोहोपाडा ते पराडे या रस्त्याच्या अंतरावरील पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला या रस्त्यावर संपूर्ण अंधार पसल्यामुळे वाहन चालकांसमोर एक दिव्यच होवून बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यालगत असणार्‍या एचओसी वसाहत, खाणे आंबिवली गाव, माणिक प्रबळ अदि ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रस्ता हा पाताळगंगा रसायनी औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. तरी या रस्त्यावर सर्वांच्या होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधीतांनी पथदिव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:00+5:302014-06-20T21:25:00+5:30

मोहोपाडा-रसायनी : मोहोपाडा ते पराडे या रस्त्याच्या अंतरावरील पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला या रस्त्यावर संपूर्ण अंधार पसल्यामुळे वाहन चालकांसमोर एक दिव्यच होवून बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यालगत असणार्‍या एचओसी वसाहत, खाणे आंबिवली गाव, माणिक प्रबळ अदि ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रस्ता हा पाताळगंगा रसायनी औद्योगिक परिसराला जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. तरी या रस्त्यावर सर्वांच्या होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधीतांनी पथदिव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Citizens are afraid of leaving the chemical pathway | रसायनीत पथदिवे बंद असलयने नागरिकांत भीती

रसायनीत पथदिवे बंद असलयने नागरिकांत भीती

-उ
द्धव ठाकरेंनी मांडला मुंबईचा विकास आराखडा
मुंबई - गोराई ते नरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोड, मुंबईच्या पूर्व किनारप˜ीचा विकास आणि रेसकोर्सच्या जागी उद्यानाची संकल्पना मांडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईच्या विकास आराखड्याचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले. एकीकडे मनसेची ब्ल्यू-प्रिंट अद्याप गुलदस्त्यात असतानाच विकास आराखडा मांडून शिवसेनेने कुरघोडी केली.
शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले की, कोस्टल रोडचा प्रस्ताव गेली दोन वर्षे राज्य सरकारने स्वत:कडेच ठेवला. आता हा प्रकल्प मुंबई महापालिका करणार आहे. यासाठी केवळ पर्यावरण मंजुरीची आवश्यकता असून बाकी निधी पालिका स्वत: उभा करेल. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा नवा मार्ग खुला होणार असून मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल.
पि›म किनारप˜ी प्रमाणेच मुंबईला पूर्व किनारप˜ी आहे. याची अनेकांना कल्पनाच नाही. पोर्ट ट्रस्ट, डॉकयार्ड व नौसेनेकडे तब्बल ४३८० एकर जागा आहे. यातील ९११ एकर जमीन अतिरिक्त असून मुंबईच्या विकासाठी ती खुली करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. या भागात गृहनिर्माण, समुद्र पर्यटन आणि उद्योग उभारणे शक्य असल्याचे ते म्हणाले.
पूर्व किनारप˜ीवर हार्बर लाईल, बीपीटीची स्वतंत्र रेल्वे लाईन, पूर्व मुक्तवाहिनी असल्याने ट्रान्सहार्बर लिंक रोडदेखिल याच भागात बनेल. संपर्काची आणि दळणवळणाची सोय असणा-या या भागात जलद विकास शक्य असल्याचा दावा त्यांनी केला.
महालक्ष्मी येथील रेसकोर्स जागेवरील भूमिकेबाबत बोलत असताना, सर्वानुमते रेसकोर्स मुंबईच्या बाहेरही हलवता येऊ शकतो आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरील उद्यान उभारता येईल. या उद्यानाचा आराखडाही तयार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
-------------------------------------------------
कोस्टल रोडसारखा महाकाय प्रकल्प मुंबई महापालिकेला झेपेल का, अशी शंका व्यक्त केली असता उद्धव म्हणाले, आम्हाला फक्त परवानगी हवी. प्रकल्प राबविण्यास मुंबई महापालिका समर्थ आहे. ३० लाख कोटींची मालमत्ता, ३० हजार कोटींच्या मुदत ठेवी तर एफएसआयच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध होणारे ३ हजार कोटी यामुळे पालिकेला हा प्रकल्प सहजशक्य असल्याचे शिवसेना खा. राहुल शेवाळे यांनी सांगितले.

Web Title: Citizens are afraid of leaving the chemical pathway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.