शधावाटप कार्यालयात पाणीसंततधार पावसाचे पाणी साचून डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील शिधा वाटप कार्यालयात पाणी शिरण्याचा प्रकार दरवर्षी चालू आहे. १७ जुलैला या कार्यालयात पाणी साचले होते. त्यामुळे तेथील कर्मचार्याने पाण्यात काम करण्यास इन्कार केला होता.त्यानंतर ठाणे फ मंडळामधून तेथील उपनियंत्रक पाहणी करण्यास येऊन गेले. प्रत्येक वेळी या शिधावाटप कार्यालयात वेळो-वेळी पाणी साचल्यावर कोणी ना कोणी पाहणी करून जाते. पण आजपर्यंत याची दखल अन्न नागरीपुरवठा अधिकारी किंवा नियंत्रक कार्यालयाकडून केराची टोपली दाखविली जाते. डोंबिवली पूर्व बाजूस एका समाजसेवकाने आपल्या आठ वर्षांच्या सतत पाठपुराव्याने शिधावाटप कार्यालय सुरू केले आहे. डोंबिवली पश्चिम येथील शिधावाटप कार्यालयाची दुरुस्ती करून कर्मचारी व कार्डधारकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे. - -मोहिनीकांत घोसाळकर,डोंबिवली
सिटीजन
शिधावाटप कार्यालयात पाणी
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:41+5:302014-08-31T22:51:41+5:30
शिधावाटप कार्यालयात पाणी
