बेहरानपूर : ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका चिटफंड कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी रविवारी अटक केली.
अश्विनीकुमार नायक असे या संचालकाचे नाव आहे. काटलोन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीचा तो संचालक आहे. रविवारी रात्री बेहरानपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला अटक केली. नायक हा गंजाम जिल्ह्याच्या रामांदा येथील राहणारा आहे. किमान २४ गुंतवणूकदारांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.
चिटफंड घोटाळ्यात हजारो गुंतवणूकदारांना गंडविण्यात आले असून, आयुष्यभराची जमापुंजी लोकांनी गमावली आहे. या प्रकरणाचा तपास लांबला
आहे. (वृत्तसंस्था)
चिटफंड घोटाळा; संचालकास अटक
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका चिटफंड कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी रविवारी अटक केली.
By admin | Updated: July 6, 2015 22:48 IST2015-07-06T22:48:55+5:302015-07-06T22:48:55+5:30
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका चिटफंड कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी रविवारी अटक केली.
