Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनचा विदेश व्यापार घटला

चीनचा विदेश व्यापार घटला

चीनला मंदीची झळ बसण्यास सुरुवात झाली असून, आॅगस्टमध्ये विदेश व्यापार ९.७ टक्क्यांनी घटून ३२०.८ अब्ज डॉलर झाला. त्याचवेळी गंगाजळीत ९३.९ अब्ज डॉलरची

By admin | Updated: September 9, 2015 03:30 IST2015-09-09T03:30:06+5:302015-09-09T03:30:06+5:30

चीनला मंदीची झळ बसण्यास सुरुवात झाली असून, आॅगस्टमध्ये विदेश व्यापार ९.७ टक्क्यांनी घटून ३२०.८ अब्ज डॉलर झाला. त्याचवेळी गंगाजळीत ९३.९ अब्ज डॉलरची

China's Foreign Trade Declined | चीनचा विदेश व्यापार घटला

चीनचा विदेश व्यापार घटला

बीजिंग : चीनला मंदीची झळ बसण्यास सुरुवात झाली असून, आॅगस्टमध्ये विदेश व्यापार ९.७ टक्क्यांनी घटून ३२०.८ अब्ज डॉलर झाला. त्याचवेळी गंगाजळीत ९३.९ अब्ज डॉलरची घट होऊन ३,५६० अब्ज डॉलर झाली.
जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ कस्टम्सद्वारे (जीएसी) जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. निर्यात वर्षभरात ६.१ टक्क्यांनी घटून १२०० अब्ज युआन झाली, तर आयातही १४.३ टक्क्यांनी घटून ८३६.१अब्ज युआन झाली. जुलैमध्ये निर्यात ८.९ टक्क्यांनी, तर आयात ८.६ टक्क्यांनी घटली होती. या आकडेवारीनुसार आॅगस्टमध्ये चीनची व्यापार तूट २०.१ टक्क्यांनी वाढून १२०० अब्ज युआन झाली. २०१५ मधील पहिल्या आठ महिन्यांत विदेश व्यापार ७.७ टक्क्यांनी घटून १५,६७० अब्ज युआन झाला. जानेवारी-आॅगस्टदरम्यान निर्यात १.६ टक्क्यांनी घटून ८,९५० युआन, तर आयात १४.६ टक्क्यांनी घटून ६,७२० अब्ज युआन झाली. मात्र अलीकडेच चीनने आपल्या युआन या चलनाचे अवमूल्यन केल्याने निर्यात वाढविण्यात यश मिळाल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Web Title: China's Foreign Trade Declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.