नवी दिल्ली : संपूर्ण जगात मंदीचे वारे वाहत असताना गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ ठरला. त्यामुळे २०१५ मध्ये भारताने वेगवान आर्थिक वृद्धीचा विचार करता चीनला मागे टाकले. आर्थिक सुधारणा चालूच राहिल्यास आणि व्यावसायिक वातावरणात सुधारणा झाल्यास नवीन वर्षात भारताचा वृद्धीदर ७ ते ७.५ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि खासगी क्षेत्रातील कमी गुंतवणूक ही आव्हाने कायम असली तरीही प्रत्यक्ष कर सुसंगत करणे, प्रलंबित असलेला जीएसटी लागू करणे, व्यवसाय सुलभता, सामाजिक व भौतिक पायाभूत प्रकल्पासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करणे याला सरकार प्राधान्य देणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
प्रमुख चार अर्थव्यवस्थेत वेगाने आर्थिक वृद्धी करण्यात भारत आघाडीवर राहू शकतो, असे मत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, २०१६ मध्ये भारत ७ ते ७.५ टक्के दराने वृद्धी करू शकतो. प्रमुख अर्थव्यवस्थेत भारत आघाडीवर असेल ही अपेक्षाकेवळ २०१५ सालासाठीच नव्हे, तर २०१६ सालासाठीही असेल.
आर्थिक वृद्धीदरात चीनला धोबीपछाड
संपूर्ण जगात मंदीचे वारे वाहत असताना गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ ठरला. त्यामुळे २०१५ मध्ये भारताने वेगवान आर्थिक वृद्धीचा विचार करता चीनला मागे टाकले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2016 01:30 IST2016-01-01T01:30:56+5:302016-01-01T01:30:56+5:30
संपूर्ण जगात मंदीचे वारे वाहत असताना गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत ‘सर्वात आकर्षक देश’ ठरला. त्यामुळे २०१५ मध्ये भारताने वेगवान आर्थिक वृद्धीचा विचार करता चीनला मागे टाकले.
