Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुलांत मूल्यसंवर्धन करणार

मुलांत मूल्यसंवर्धन करणार

लहानपणापासून मुलांमध्ये मूल्यसंवर्धन करण्यासाठी ‘सर्फ एक्सेल’ने ‘रेडी फॉर लाईफ’ या कॅम्पेनची गुरुवारी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घोषणा केली.

By admin | Updated: April 22, 2016 02:45 IST2016-04-22T02:45:49+5:302016-04-22T02:45:49+5:30

लहानपणापासून मुलांमध्ये मूल्यसंवर्धन करण्यासाठी ‘सर्फ एक्सेल’ने ‘रेडी फॉर लाईफ’ या कॅम्पेनची गुरुवारी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घोषणा केली.

Child Prices | मुलांत मूल्यसंवर्धन करणार

मुलांत मूल्यसंवर्धन करणार

मुंबई : लहानपणापासून मुलांमध्ये मूल्यसंवर्धन करण्यासाठी ‘सर्फ एक्सेल’ने ‘रेडी फॉर लाईफ’ या कॅम्पेनची गुरुवारी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घोषणा केली. २५ एप्रिलपासून प्रत्यक्ष कॅम्पेनला सुरुवात होईल, अशी माहिती ‘हिंदुस्थान युनिलिव्हर होम केअर’ विभागाच्या कार्यकारी संचालक प्रिया नायर यांनी दिली.
प्रिया नायर म्हणाल्या, अधिकाधिक पालकांना मुलांसह या कॅम्पेनमध्ये सामावून घेतले जाईल. मुलांसोबत पालकांच्या काही अ‍ॅक्टीव्हीटीज होतील. ज्यामध्ये मुलांना शेअर करणे शिकवले जाईल. पहिले तीन महिने शहरी भागांत हे कॅम्पेन चालणार आहे. कॅम्पेनच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मुलांमध्ये मूल्यसंवर्धन करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागते, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुपम सिबल यांनी मांडले. अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाली की, मुलांना केवळ शाळेत घातल्याने पालकांची जबाबदारी संपत नाही. त्यांना कोणतीही गोष्ट वाटून घेण्याची सवयही लावायला हवी. चर्चासत्रात मुंबईच्या माजी नगरपाल व एचआर कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. इंदू साहानी आणि बालमानसोपचारतज्ज्ञ रुपल पटेलही उपस्थित होत्या. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Child Prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.