नवी दिल्ली : जेट विमानांसाठी वापरले जाणारे इंधन रविवारी तब्बल ११.३ टक्क्यांनी स्वस्त झाले. या कपातीमुळे विमानाचे इंधन आता रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांच्या इंधनापेक्षाही स्वस्त झाले आहे. गेल्या महिन्यात विमान इंधनाचे दर पेट्रोलपेक्षा स्वस्त झाले होते. जेट विमानाचे हे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युअल (एटीएफ) या नावाने ओळखले जाते.
गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या इंधनात कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही. विना सबसिडीच्या गॅसच्या किमती मात्र १0५ रुपयांनी स्वस्त करून ६0५ रुपये करण्यात आल्या आहेत. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किमती उतरून सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंधनाच्या दरात कपात होत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जेट इंधनांच्या दरात प्रतिकिलो लिटर ५,९0९.९ रुपये अशी कपात केली. त्याबरोबर राजधानी दिल्लीत जेट इंधनाचे दर आता ४६,५१३.0२ रुपये प्रतिकिलो लिटर झाले. या आधी १ जानेवारी रोजी विमान इंधनात ७५२0.५२ रुपये प्रतिकिलो लिटर म्हणजेच १२.५ टक्के कपात करण्यात आली होती.
लागोपाठ दोन मोठ्या कपातींमुळे विमानाचे इंधन आता डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विमान इंधन झाले डिझेलपेक्षाही स्वस्त
ट विमानांसाठी वापरले जाणारे इंधन रविवारी तब्बल ११.३ टक्क्यांनी स्वस्त झाले. या कपातीमुळे विमानाचे इंधन आता
By admin | Updated: February 2, 2015 03:49 IST2015-02-02T03:49:16+5:302015-02-02T03:49:16+5:30
ट विमानांसाठी वापरले जाणारे इंधन रविवारी तब्बल ११.३ टक्क्यांनी स्वस्त झाले. या कपातीमुळे विमानाचे इंधन आता
