नवी दिल्ली : अमेरिकेत येणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलण्याचे आपले मनसुबे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखविले आहेत.
अमेरिकेतील नोकऱ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चार लाख रोजगारांचे योगदान देणाऱ्या भारतीय आयटी कंपन्यांना धडकी भरली असली तरी यात काळजी करण्यासारखे काही नसल्याचा सूरही आता उमटत आहे. एच १ बी व्हिसा आणि एल १ व्हिसा कार्यक्रमात हे बदल अपेक्षित आहेत.
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात याबाबत विधेयक सादर झालेले आहे. ते भारतीय कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरु शकते का? आदी अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)
नोकरी शोधणाऱ्या भारतीयांवर काय परिणाम?
एक चांगले पॅकेज देऊन कंपन्या विदेशी कर्मचाऱ्यांना आकृष्ट करू शकतात. अमेरिकेत नोकरीची संधी शोधणाऱ्या भारतीयांना एक आकर्षक पॅकेज मिळू शकते.
तर, नोकरी शोधणाऱ्यांना एल १ व्हिसाचाही पर्याय आहेच. किंवा कर्मचाऱ्यांना एल १ व्हिसाचा आग्रहही होऊ कारण, एल १ मध्ये वेतनाबाबत काही प्रतिबंध नाहीत.
भारतीय आयटी कंपन्यांच्या मतानुसार, अमेरिकेत ते आयटी टॅलेंट नाही. त्यामुळे त्यांना भारतातून कर्मचारी बोलवावेच लागतील. ही एकतर्फी वाहतूक नाही. कारण, भारतीय आयटी कंपन्या अमेरिकेत रोजगार निर्माण करतात आणि तेथील अर्थव्यवस्थेत योगदान देतात.
चार लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात भारतीय कंपन्यांचे योगदान आहे. वार्षिक करात याचे मूल्यांकन पाच बिलियन डॉलर एवढे आहे. तर, या दोन व्हिसाच्या आधारे भारतीय अमेरिकेत एक बिलियन डॉलरचे योगदान देतात.
व्हिसाच्या खर्चात वाढ
जानेवारी २०१६ मध्येच अमेरिकेने एच १ बी आणि एल १ व्हिसाच्या खर्चात वाढ केलेली आहे. एच १ बी साठीचा खर्च २००० डॉलरवरुन ४००० डॉलर झाला आहे. तर, एल १ बी व्हिसासाठी ४५०० डॉलर लागणार आहेत.
अमेरिकेतील ५० व त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी एच १ बी आणि एल १ व्हिसाचे आहेत.
पात्रता बदलण्याचा प्रस्ताव
‘प्रोटेक्ट अँन्ड ग्रो अमेरिकन जॉब अॅक्ट’मध्ये पात्रतेत महत्वपूर्ण बदल करण्याचा प्रस्ताव आहे. यातील प्रमुख मुद्दे असे आहेत.
च्एच १ बी व्हिसासाठी मास्टर डिग्रीतून सूट देण्यात आली आहे. पण, संंबंधित अर्जदाराकडे त्या समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
अमेरिकेत ५० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक एच १ बी व्हिसा व एल १ व्हिसाचे (विदेशी कर्मचाऱ्यांचे तात्पुरते स्थलांतर) कर्मचारी असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
एच १ बी व्हिसाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी किमान एक लाख डॉलरची वाढ करावी, असा प्रस्ताव आहे. सद्या ही वाढ साठ हजार डॉलर एवढी आहे. भारतीय आयटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी हे नवे आकर्षण मानले जात आहे.
एच १ बी व्हिसात बदल, पण काळजी कशाला?
अमेरिकेत येणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलण्याचे आपले मनसुबे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 01:39 IST2017-01-14T01:39:39+5:302017-01-14T01:39:39+5:30
अमेरिकेत येणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांसाठी नियम बदलण्याचे आपले मनसुबे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखविले
