नवी दिल्ली : सर्व बँक खात्यातील माहिती आणि परदेशी प्रवासाचे सर्व तपशील प्राप्तिकराच्या विवरणात बंधनकारक करण्यात आल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या आयटीआर फॉर्ममध्ये बदल करण्यात आले असून केवळ आयटीआर - २ या फॉर्म भरणाऱ्या करदात्यांनाच परदेशी प्रवासाचे तपशील देणे बंधनकारक केले असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. आयटीआर फॉर्म -१ आणि ४ क्रमांकांना यातून वगळल्याचे जेटली यांनी सांगितले असले तरी, आयटीआय - २ फॉर्म भरणाऱ्या करदात्यांची संख्याच जास्त असल्याने या श्रेणीत मोडणाऱ्या आणि परदेशी प्रवास करणाऱ्या करदात्यांना ही माहिती द्यावी लागणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षापर्यंत लागू असलेल्या आयटीआर फॉर्ममध्ये बदल करून गेल्या १५ एप्रिल रोजी वित्तमंत्रालयाने प्राप्तिकर विवरणाचे नवे फॉर्म सादर केले होते. मात्र. विवरण भरणाऱ्या व्यक्तीचे सर्व बँक खात्याचे तपशील व परदेशी प्रवासाचे तपशील भरावे लागण्याची सक्ती केल्याने मोठा वादंग उसळला होता. स्वत: वित्तमंत्र्यांनी याची दखल घेत बदल करण्याचे संकेत दिले. या संदर्भात आज राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नादरम्यान त्यांनी यात बदल केल्याचा खुलासा केला आणि सर्व बँक खात्याचा तपशील ही अट काढून टाकली मात्र, आयटीआर-२मध्ये परदेशी प्रवासाचा तपशील देण्याची अट कायम ठेवली आहे. या संदर्भात जेटली म्हणाले की, काळ््यापैशासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने जो अहवाल दिला आहे, त्यातच ही शिफारस करण्यात आली होती. ती शिफारस सरकारने स्वीकारली आहे. यामुळे करदात्याचे उत्पन्न, खर्च तसेच परदेशी प्रवासादरम्यान होणाऱ्या परकीय चलनाचे व्यवहार आदी सर्वांची माहिती सरकारला प्राप्त होतानाच, काळ््यापैशाला पायबंद घालणे शक्य होणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार, नोकरदार लोक व ज्यांना अन्य मालमत्तेच्या स्त्रोतातून उत्पन्न आहे, अशा लोकांना आयटीआर १ फॉर्म भरावा लागतो. तर, नोकरदार व ज्यांना पगाराखेरीज अन्य मार्गाने जमा होणारे उत्पन्न,म्हणजे, अगदी पीपीएफचे जमा होणारे व्याज, ज्यांना गृहकर्जातून वजावट मिळते अशा लोकांना आयटीआर-२ हा फॉर्म भरावा लागतो. याच श्रेणीत बहुतांश लोकांचा समावेश आहे. तर उद्योग-व्यवसाय करणाऱ्या लोकांतर्फे आयटीआर-४ एस हा फॉर्म भरला जातो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्राप्तिकराच्या फॉर्ममध्ये बदल; पण...
सर्व बँक खात्यातील माहिती आणि परदेशी प्रवासाचे सर्व तपशील प्राप्तिकराच्या विवरणात बंधनकारक करण्यात आल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या आयटीआर
By admin | Updated: May 13, 2015 00:57 IST2015-05-13T00:57:43+5:302015-05-13T00:57:43+5:30
सर्व बँक खात्यातील माहिती आणि परदेशी प्रवासाचे सर्व तपशील प्राप्तिकराच्या विवरणात बंधनकारक करण्यात आल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या आयटीआर
