Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजदरात अर्धा टक्का कपातीची शक्यता

व्याजदरात अर्धा टक्का कपातीची शक्यता

महागाई कमी होण्याकडे कल पाहता रिझर्व्ह बँकेकडून उद्योग जगताला व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

By admin | Updated: September 28, 2015 01:54 IST2015-09-28T01:54:00+5:302015-09-28T01:54:00+5:30

महागाई कमी होण्याकडे कल पाहता रिझर्व्ह बँकेकडून उद्योग जगताला व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Chance of deduction of half-yearly interest rates | व्याजदरात अर्धा टक्का कपातीची शक्यता

व्याजदरात अर्धा टक्का कपातीची शक्यता

नवी दिल्ली : महागाई कमी होण्याकडे कल पाहता रिझर्व्ह बँकेकडून उद्योग जगताला व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या द्विमासिक कर्ज आणि चलन धोरणाची समीक्षा करताना व्याजदरात ०.२५ ते ०.५० टक्के कपात होण्याची आशा आहे.
असोचॅम या वाणिज्य आणि उद्योग मंडळाच्या ताज्या अहवालानुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर(सीपीआय)आधारित किरकोळ महागाईचा दर विक्रमी ३.६६ टक्क्यावर आला असून, तो रिझर्व्ह बँकेने २०१६ साठी निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा कमी आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय)आधारित महागाईचा दर लागोपाठ दहाव्या महिन्यात घसरला आहे.
व्याजाबाबत संवेदनशील असलेल्या रिअल इस्टेट, बांधकाम, उत्पादन, आॅटोमोबाईल आदी क्षेत्राने मागणी वाढविण्यासाठी अल्पकालीन कर्ज व्याजदर कपातीच्या घोषणेकडे डोळे लावले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Chance of deduction of half-yearly interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.