कानपूर : ‘लेदर’ उद्योगासाठी ब्राझीलहून कच्चा माल आयात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. ‘लेदर’ उद्योगाच्या कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ ४ ते ८ आॅगस्टदरम्यान ब्राझील व अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर जाणार आहे. कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्टने यासाठी पुढाकार घेतला आहे.
चामड्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कानपूरसह देशभरात चामड्याच्या वस्तूंच्या मागणीत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत ‘लेदर’ उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत, असे कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्टचे विभागीय अध्यक्ष ताज आलम यांनी सांगितले. ब्राझील व अर्जेंटिना या देशांत कच्च्या चामड्याची मोठी उपलब्धता आहे. या दोन देशांमधून अमेरिका, चीन, इटली, जर्मनी आणि थायलंडमध्ये कच्चा माल व चामड्याच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. त्यामुळे भारतानेही कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी या दोन देशांवर लक्ष केंद्रित केले आहे, असेही आझम म्हणाले. व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ केवळ कच्च्या मालाची बाजारपेठच शोधणार नाही, तर या देशांमध्ये चामड्याच्या वस्तूंची निर्यात करण्याच्या संधींचीही चाचपणी करणार आहे.लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये चामड्याच्या वस्तूंची मोठी मागणी आहे; मात्र भारतातून या देशांत होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण कमी आहे.निर्यात वाढविण्यासाठीही यापुढे कौन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट प्रयत्न करणार आहे. (वृत्तसंस्था)
‘लेदर’ उद्योगापुढे कच्च्या मालाचे आव्हान
लेदर’ उद्योगासाठी ब्राझीलहून कच्चा माल आयात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे.
By admin | Updated: August 2, 2014 03:51 IST2014-08-02T03:51:32+5:302014-08-02T03:51:32+5:30
लेदर’ उद्योगासाठी ब्राझीलहून कच्चा माल आयात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे.
