Lokmat Money > बिझनेस न्यूज > शहरी गरिबीचे नव्या सरकारसमोर आव्हान

शहरी गरिबीचे नव्या सरकारसमोर आव्हान

शहरातील असणारी गरिबी नव्या सरकारसमोर मोठे आवाहन असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या एका अधिकार्‍याने सांगितले़ आहे.

By admin | Updated: May 7, 2014 04:04 IST2014-05-07T04:04:20+5:302014-05-07T04:04:46+5:30

शहरातील असणारी गरिबी नव्या सरकारसमोर मोठे आवाहन असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या एका अधिकार्‍याने सांगितले़ आहे.

Challenge against urban poverty new government | शहरी गरिबीचे नव्या सरकारसमोर आव्हान

शहरी गरिबीचे नव्या सरकारसमोर आव्हान

नवी दिल्ली : शहरातील असणारी गरिबी नव्या सरकारसमोर मोठे आवाहन असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या एका अधिकार्‍याने सांगितले़. शहरातील गरिबीला गरिबी निर्मूलन योजनांचा फायदा होत नाही़ त्यामुळे महागाईचा सर्वाधिक फटका शहरी गरिबांना बसतो, असेही ते म्हणाले़.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे संचालक प्रणब सेन म्हणाले की, मागील काही वर्षात महागाईदर वाढतच आहे़ महागाईची सर्वाधिक झळ शहरातील गरीब लोकांना बसत आहे़ या परिस्थितीशी निपटारा करणे, हे नव्या सरकारसमोर मोठे आव्हान आहे़ मागील पाच वर्षांत या मुद्यावर काहीही चर्चा झाली नाही़ यादरम्यान काही उल्लेखनीय कामही झाले नाही़ रोजगार गॅरंटी योजनेमुळे ग्रामीण भागातील गरिबी महागाईच्या चटक्यापासून बचावली़; परंतु शहरातील गरिबी नष्ट करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असेही ते म्हणाले़ ग्रामीण भागातील गरीब लोकांना खाद्यान्न, भाजीपाला, फळे व दुधासारखे पदार्थ योग्य दरात सहज उपलब्ध होतात़; परंतु शहरातील गरीब जनतेला या वस्तू बाजारभावाने खरेदी कराव्या लागतात़ सेन यांच्या मते औद्योगिक उत्पादन ठप्प झाल्यामुळे शहरी परिसरातील रोजगार कमी झाला आहे़ याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर झाला़ एप्रिल-फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ०़१ टक्के घट झाली़ यापूर्वीच्या आर्थिक वर्षात या निर्देशांकात ०़९ टक्के वाढ झाली होती, असेही सेन म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Challenge against urban poverty new government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.