नवी दिल्ली : जनधन योजनेच्या सफलतेनंतर केंद्र सरकार सर्वांना पॅनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना आखीत आहे. १ लाखावरच्या प्रत्येक खरेदीत पॅन क्रमांक आवश्यक करण्याचा निर्णय सरकारने अर्थसंकल्पाच्या वेळी घोषित केला होता. त्यासाठी पॅन क्रमांक आवश्यक आहे.
पॅनकार्डसाठी आॅनलाईन सुविधा सुरू केली जाणार आहे. येथे अर्ज केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड मिळू शकेल. ग्रामीण भागात पॅन कार्डसाठी विशेष शिबिरे लावली जातील. देशात सध्या २४ ते २४ लाख परिवार आहेत. आतापर्यंत २१ कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. यापैकी ७.५ पॅनकार्ड कंपन्यांकडे आहेत. देशात असंख्य लोकांकडे पॅन कार्ड नाहीत, याची कबुली वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी अलीकडेच दिली होती. खरेदीवर पॅनकार्डची सक्ती करण्यात हीच मुख्य अडचण असल्याचेही त्यांनी मान्य केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्वांना पॅनकार्ड देण्याची केंद्र सरकारची योजना
जनधन योजनेच्या सफलतेनंतर केंद्र सरकार सर्वांना पॅनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना आखीत आहे.
By admin | Updated: May 10, 2015 22:44 IST2015-05-10T22:41:27+5:302015-05-10T22:44:17+5:30
जनधन योजनेच्या सफलतेनंतर केंद्र सरकार सर्वांना पॅनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना आखीत आहे.
