-केंद्रीय समिती आपत्ती मदत-
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30

-केंद्रीय समिती आपत्ती मदत-
>महाराष्ट्राला ७ हजार कोटींचीमदत द्या; खासदारांची मागणीनवी दिल्ली : केंद्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष व गृहमंत्री राजनाथ सिंह यांची राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ व गारपिटीसाठी ७ हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली.महाराष्ट्र शासन एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीत मोठी मदत करू शकत नाही. राज्य सरकारची तेवढी आर्थिक क्षमता नसल्याचे शिष्टमंडळाने राजनाथ सिंह यांच्या लक्षात आणून दिले. शिष्टमंडळात नाना पटोले, दिलीप गांधी यांच्यासह विदर्भ-मराठवाड्यातील १० खासदारांचा समावेश होता. शिष्टंमडळाच्या निवेदनावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)