Lokmat Money > बिझनेस न्यूज > डाळींचा शिलकी साठा करण्याचे केंद्राचे आदेश

डाळींचा शिलकी साठा करण्याचे केंद्राचे आदेश

महागाईवर मात करण्यासाठी तूर आणि उडीद डाळींचा शिलकी साठा (बफर स्टॉक) करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत

By admin | Updated: April 4, 2016 02:38 IST2016-04-04T02:38:14+5:302016-04-04T02:38:14+5:30

महागाईवर मात करण्यासाठी तूर आणि उडीद डाळींचा शिलकी साठा (बफर स्टॉक) करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत

Center's order to save the balance | डाळींचा शिलकी साठा करण्याचे केंद्राचे आदेश

डाळींचा शिलकी साठा करण्याचे केंद्राचे आदेश

नवी दिल्ली : महागाईवर मात करण्यासाठी तूर आणि उडीद डाळींचा शिलकी साठा (बफर स्टॉक) करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत. आगामी महिन्यांत डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी या सूचना राज्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी डाळींचे किरकोळ विक्रीचे भाव २१0 रुपये किलोपर्यंत वर चढले होते. आता त्यात थोडी घसरण झाली आहे. तरीही या डाळी १६0 ते १७0 रुपये किलो आहेत. सरकारे साठेबाजांवर कठोर कारवाई केल्यानंतर भाव खाली आले होते. २0१५ च्या खरीप हंगामात केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळींचा ५0 हजार टनांचा शिलकी साठा याआधीच तयार केला आहे. आता रबी हंगामातील डाळींची खरेदी सरकार करीत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत शिलकी साठ्यातील डाळीसाठी मागणी नोंदविण्यास राज्यांना सांगण्यात आले.

Web Title: Center's order to save the balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.