Lokmat Money > बिझनेस न्यूज > सपकाळ नॉलेज हबमध्ये जागतिक एड्सविरोधी दिन साजरा

सपकाळ नॉलेज हबमध्ये जागतिक एड्सविरोधी दिन साजरा

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, रवींद्र गंभीरराव सपकाळ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, लेट जी. एन. सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय व के. आर. सपकाळ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, अंजनेरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्सविरोधी दिन साजरा करण्यात आला.

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:51+5:302014-12-03T22:35:51+5:30

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, रवींद्र गंभीरराव सपकाळ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, लेट जी. एन. सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय व के. आर. सपकाळ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, अंजनेरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्सविरोधी दिन साजरा करण्यात आला.

Celebrate the World AIDS Day in the Sakal Knowledge Hub | सपकाळ नॉलेज हबमध्ये जागतिक एड्सविरोधी दिन साजरा

सपकाळ नॉलेज हबमध्ये जागतिक एड्सविरोधी दिन साजरा

शिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, रवींद्र गंभीरराव सपकाळ औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, लेट जी. एन. सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय व के. आर. सपकाळ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, अंजनेरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्सविरोधी दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. सौदागर यांनी एड्सची कारणे, समाज जागृती व एड्सबाधित व्यक्तीस समाजाकडून मिळणारा दुजाभाव आणि रोगावर नियंत्रण मिळविण्यासंबंधी उपाययोजनांवर प्रकाश टाकला.
यानिमित्त पोस्टर्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एड्स संदर्भातील विविध विषयांवर पोस्टर्स विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर पोस्टर्स स्पर्धेचे प्रा. एस. बी. गोंदकर व प्रा. डॉ. ए. बी. दरेकर यांनी परिक्षण केले. कार्यक्रमासाठी सपकाळ नॉलेज हबचे सीईओ डॉ. माधव देव सारस्वत, डॉ. एस. बी. धांडे, संचालक के. आर. सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, डॉ. व्ही. जे. गोंड, प्राचार्य लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जी. बी. जाधव, प्रा. डी. जी. उमाळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. बी. ए. भैरव यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Celebrate the World AIDS Day in the Sakal Knowledge Hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.