राजेश निस्ताने, यवतमाळ
‘सीसीआय’च्या (कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) कापूस खरेदीतील गौडबंगाल उघड झाले आहे. लांब धागा म्हणजे रुई कमी आणि रुई जास्त म्हणजे आखूड धागा, असे हे समीकरण आहे. मात्र सद्य:स्थितीत ‘सीसीआय’कडे दुय्यम दर्जाच्या कापसाचीच आवक सर्वाधिक आहे.
कापूस खरेदीसाठी खासगी व शासकीय व्यवस्था असली तरी सीसीआयचे केवळ दर्जेदार कापूस खरेदीलाच प्राधान्य असते. सीसीआयने आतापर्यंत विदर्भात ३१ लाख क्विंटल तर खान्देश-मराठवाड्यात ४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे; मात्र महामंडळाला मराठवाडा आणि खान्देशात यावेळी दुय्यम दर्जाच्या कापसाची खरेदी करावी लागत आहे. त्यात मोठे गौडबंगाल आहे.
तज्ज्ञांच्या मते, दर्जेदार कापसातून लांब धागा मिळतो; मात्र त्याच वेळी या कापसातून रुई कमी आणि सरकी जास्त निघते. विदर्भातच फक्त दर्जेदार कापूस मिळत असल्याने त्याची लांबी ३० मि.मी. तर त्यातून ३४ किलो रुई (लिंट रेट) व ६६ किलो सरकी निघत आहे. याउलट खान्देश आणि मराठवाड्यात तब्बल ३५ खरेदी केंद्रे असतानाही पाण्याच्या कमतरतेमुळे येथे दुय्यम दर्जाचा कापूस खरेदी करावा लागत आहे. त्याची लांबी २८ मि.मी. एवढीच आहे, तर रुईचे प्रमाण ३६ ते ३७ टक्क्यांपर्यंत जात आहे. सीसीआयचे ग्रेडर मात्र रुईचे प्रमाण केवळ ३३ ते ३४ टक्के दाखवीत आहे. क्ंिवटलमागे किमान दोन किलो रुईची ‘मार्जिन’ ठेवून सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर घोटाळे सुरू आहेत. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर कापूस जिनिंग प्रेसिंग व्यावसायिकांना विकला जात आहे.
‘सीसीआय’कडे दुय्यम दर्जाचाच कापूस
‘सीसीआय’च्या (कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) कापूस खरेदीतील गौडबंगाल उघड झाले आहे. लांब धागा म्हणजे रुई कमी आणि रुई जास्त म्हणजे आखूड धागा
By admin | Updated: February 23, 2015 23:26 IST2015-02-23T23:26:37+5:302015-02-23T23:26:37+5:30
‘सीसीआय’च्या (कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) कापूस खरेदीतील गौडबंगाल उघड झाले आहे. लांब धागा म्हणजे रुई कमी आणि रुई जास्त म्हणजे आखूड धागा
