Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘शारदा’ प्रकरणी सीबीआयच्या धाडी

‘शारदा’ प्रकरणी सीबीआयच्या धाडी

ज्या ठिकाणी धाडी घालण्यात आल्या, त्यात ओडिशाच्या राज्यसभेचे सदस्य प्यारीमोहन महापात्रा यांच्या दिल्ली व भुवनेश्वरमधील निवासस्थानांवर व दोन सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी घालण्यात आल्या

By admin | Updated: November 19, 2014 01:23 IST2014-11-19T01:23:57+5:302014-11-19T01:23:57+5:30

ज्या ठिकाणी धाडी घालण्यात आल्या, त्यात ओडिशाच्या राज्यसभेचे सदस्य प्यारीमोहन महापात्रा यांच्या दिल्ली व भुवनेश्वरमधील निवासस्थानांवर व दोन सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी घालण्यात आल्या

CBI arrests Sharda case | ‘शारदा’ प्रकरणी सीबीआयच्या धाडी

‘शारदा’ प्रकरणी सीबीआयच्या धाडी

नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) दिल्ली व मुंबईसह चार शहरांवर मंगळवारी धाडी घालून या घोटाळ्याशी संबंधित एका खासदाराच्या निवासस्थानाची झडतीही घेतली; मात्र याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी धाडी घालण्यात आल्या, त्यात ओडिशाच्या राज्यसभेचे सदस्य प्यारीमोहन महापात्रा यांच्या दिल्ली व भुवनेश्वरमधील निवासस्थानांवर व दोन सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी घालण्यात आल्या. सीबीआयने दिल्ली, ओडिशा, कोलकाता व मुंबई या चार महानगरांतील काही औद्योगिक घराणी व दलालांवर धाडी घातल्या आहेत. याखेरीज सीशोर प्रमुखांच्या निकटवर्ती असलेल्या सहकाऱ्यांच्याही निवासस्थानांवर धाडी घालण्यात आल्या.
भुवनेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना महापात्रा यांनी, आपल्या घरावर घातलेल्या धाडीचे आपण स्वागत करतो असे म्हटले आहे. सीबीआयच्या पथकाने घराचा शोध घेतला, माझे बँकेचे पासबुक, संपत्तीचे विवरण, पक्षाची कागदपत्रे व अन्य सामान घेऊन ते गेले अशी माहिती महापात्रा यांनी दिली. ही धाड कशासाठी घातली गेली असे विचारले असता महापात्रा यांनी त्या तपास वॉरंटवर कुठलेही कारण लिहिले नव्हते अशी माहिती दिली. कुठल्याही चिटफंड घोटाळ्याशी आपला संबंध नसल्याचे महापात्रा यांनी पुढे म्हटले. मात्र याआधी महापात्रा यांनी, सीशोर ग्रुपचे प्रमुख प्रशांत दाश यांच्यासोबत भेट झाल्याचे स्वीकारले होते. ते आपल्या घरी आले होते व त्यांनी नवरंगपूर जिल्ह्यात मका प्रक्रिया केंद्र स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता, असे महापात्र यांनी सांगितले. दाश सध्या कारागृहात आहेत. राज्य सशस्त्र पोलीस दलाचे माजी महासंचालक व तृणमूलचे उपाध्यक्ष रजत मुजुमदार आणि ईस्ट बंगाल क्लबचे पदाधिकारी देवव्रत सरकार यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत असल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: CBI arrests Sharda case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.