नवी दिल्ली : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसारख्या घटकांचे हित ध्यानात घेऊनच लघु बचत योजनांवरील व्याजदरात कपात करताना सावधानता बाळगली जाईल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडणार असला तरी वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पेट्रोल व डिझेलवरील अधिभार तीन पटीने वाढविण्यात आला आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग महामार्ग सारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी केला जात आहे; परंतु वेतन आणि पेन्शनवरील खर्च वाढल्याने सामाजिक योजनांसाठी निधीची तरतूद करणे एक आव्हान असेल.
- लघु बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याच्या मुद्यांवर येथे एका कार्यक्रमात बोलतांना अरुण जेटली यांनी सुकन्या समृद्धी योजनेचे उदाहरण दिले. वर्षभरानंतर या योजनेवरील व्याजदरात कपात करणे योग्य ठरणार नाही. तथापि, व्याजदर कमी करण्यासाठी सावधानता बाळगावी लागेल.
‘सावधतेने लघु बचत योजनेचे व्याज कमी करणार’
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसारख्या घटकांचे हित ध्यानात घेऊनच लघु बचत योजनांवरील व्याजदरात कपात करताना सावधानता बाळगली जाईल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
By admin | Updated: December 5, 2015 00:54 IST2015-12-05T00:54:03+5:302015-12-05T00:54:03+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसारख्या घटकांचे हित ध्यानात घेऊनच लघु बचत योजनांवरील व्याजदरात कपात करताना सावधानता बाळगली जाईल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
