Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिबाँडिंगनंतर केसांची काळजी

रिबाँडिंगनंतर केसांची काळजी

रिबाँडिंगनंतर केसांची काळजी

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:25+5:302014-08-22T22:11:25+5:30

रिबाँडिंगनंतर केसांची काळजी

Care of hair after rebounding | रिबाँडिंगनंतर केसांची काळजी

रिबाँडिंगनंतर केसांची काळजी

बाँडिंगनंतर केसांची काळजी
केसांना रसायनांच्या साहाय्याने सरळ करण्याची प्रक्रिया म्हणजेच रिबाँडिंग. या प्रक्रियेत केसांतील रासायनिक बंध तोडून त्यांची पुनर्बांधणी म्हणजेच रिबाँडिंग केली जाते. या प्रक्रियेत केसांमधील सर्वच -------------कर्ल्सस-------- सरळ होतात. अतिशय रुक्ष आणि कुरळे असतात. या प्रक्रियेचा परिणाम बराच काळ टिकतो. त्यामुळेच तरुणींची या प्रक्रियेला जास्त पसंती आहे; पण रिबाँडिंग केल्यानंतर काही सावधगिरी बाळगणेही आवश्यक असते.
१) रिबाँडिंग केल्यानंतर एक आठवडा केस धुऊ नये, केसांना तेल लावू नये, केसांमध्ये क्लिप, क्लचर किंवा रबरबँडही लावू नये, केस कानांमागे टाकणेही टाळावे. असे केल्याने केसांचा आकार बिघडू शकतो.
२)रिबाँडिंगनंतर कमीत कमी वर्षभर हेअर कलरिंग, स्ट्रिकिंग आणि हायलायटिंगपासून लांब राहावे. कारण रिबाँडिंगदरम्यान तीव्र रासायनिक प्रक्रिया सहन करणार्‍या केसांचा इतर रासायनिक प्रक्रियांपासून बचाव करायला हवा.
३) रिबाँडिंगनंतर जास्त तापमानापासून केसांचा बचाव करायला हवा. हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनरचा वापरही टाळायला हवा, तसेच गरम पाण्याने केस धुऊ नयेत. तीव्र उन्हापासून केसांचा बचाव करावा.
४) आठवड्यातून एकदा केसांना हेअर मास्क लावावा. पंधरा दिवसांतून एकदा केसांची स्टिमिंग करणेही गरजेचे आहे, स्टिमिंगमुळे डोक्याच्या त्वचेतील रंध्रे मोकळी होतात. तेलाचे पूर्ण पोषण केसांना मिळते. तेल लावल्यानंतर गरम पाण्यात एक टॉवेल भिजवून तो डोक्यावर लपेटून घ्यावा. ही प्रक्रिया दोन-तीन वेळा करावी.
५)संतुलित आहार घ्यावा. आहारात लोह आणि व्हिटॅमीन बी कॉम्प्लेक्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा. काजू, बदाम, विविध फळे, भाज्याही रिबाँडेड केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.
६) वेळोवेळी केसांचे ट्रिमिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे केसांच्या स्प्लिट एंडस्ची समस्या होणार नाही.

Web Title: Care of hair after rebounding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.