नवी दिल्ली : आरक्षणाच्या मागणीवरून उत्तर भारतात झालेल्या आंदोलनामुळे पुरवठा बाधित झाल्याने व दिल्ली-एनसीआयमध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने फेब्रुवारीत सलग दुसऱ्या महिन्यात प्रवासी कारच्या विक्रीत घट झाली.
आॅटोमोबाईल कंपन्यांची सर्वोच्च संघटना ‘सियाम’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २0१६ मध्ये देशांतर्गत बाजारात कारची विक्री ४.२१ टक्क्यांनी घटली. या काळात १६४४६९ कारची विक्री झाली. फेब्रुवारी २0१५ मध्ये १७१७९३ कारची विक्री झाली होती.
‘सियाम’चे उपमहासंचालक सुगत सेन यांनी सांगितले की, आरक्षणाच्या मागणीवर जाट समुदायाने उत्तर भारतात आंदोलन केल्याने अनेक कंपन्यांचे उत्पादन स्थगित झाले. त्यामुळे फेब्रुवारीत कारच्या उत्पादनावर परिणाम झाला. पुरवठा बाधित झाल्याने सलग दुसऱ्या महिन्यात कारच्या विक्रीत घसरण झाली. त्याचबरोबर दिल्ली-एनसीआयमध्ये डिझेल कारच्या विक्रीवर बंदी आल्याने कारच्या विक्रीवर परिणाम झाला.
ते म्हणाले की, याच काळात युटिलिटी वाहनांची आणि व्हॅनची विक्री अनुक्रमे २0.७१ टक्के आणि १३.२६ टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी २३0२८१ वाहनांची विक्री झाली होती. ती वाढून २३४५१५४ वाहनांची विक्री झाली.
ते म्हणाले की, निर्यात बाजारात जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लि. आणि फोर्ड इंडिया प्रा. लि. यासारख्या कंपन्यांच्या भागीदारीत तेजी आल्याने फेब्रुवारीत प्रवासी कारची निर्यात १३.७७ टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी याच काळात ३९९0१ वाहनांची निर्यात झाली होती. ती वाढून ४५३९४ इतकी झाली.
या काळात स्कूटरच्या विक्रीत १७.७१ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी या काळात ३७0५२७ स्कूटर्सची विक्री झाली होती. यंदा ४३६१६३ स्कूटर्सची विक्री झाली. मोटारसायकलीची विक्री ११.0५ टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी या काळात ७७४१२२ मोटारसायकलींची विक्री झाली होती. ती यंदा ८५९६२४ इतकी झाली.
या प्रकारे दुचाकी वाहनांची विक्री वाढली असली तरीही निर्यात ५.८३ टक्क्यांनी घटली. गेल्या वर्षी या काळात १७५८३८ वाहनांची निर्यात झाली होती. ती यंदा घटून १६५५९४ वाहनांची निर्यात झाली.
याच अवधीत व्यावसायिक वाहनांची विक्री १९.९३ टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी ५१९९८ वाहनांची विक्री झाली होती. ती वाढून ६२३५९ वाहने झाली. व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीत ११.0७ टक्क्यांनी वाढ झाली.
सलग दुसऱ्या महिन्यात कारविक्रीत घट
आरक्षणाच्या मागणीवरून उत्तर भारतात झालेल्या आंदोलनामुळे पुरवठा बाधित झाल्याने व दिल्ली-एनसीआयमध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने फेब्रुवारीत सलग
By admin | Updated: March 11, 2016 03:29 IST2016-03-11T03:29:58+5:302016-03-11T03:29:58+5:30
आरक्षणाच्या मागणीवरून उत्तर भारतात झालेल्या आंदोलनामुळे पुरवठा बाधित झाल्याने व दिल्ली-एनसीआयमध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने फेब्रुवारीत सलग
