नवी दिल्ली : सलग दुस:या महिन्यात देशातील कार विक्रीमध्ये घट नोंदली गेली आहे. सणासुदीचा काळ असतानाही ऑक्टोबरमध्ये कार विक्री अपेक्षेहून कमी झाल्याने यात 2.55 टक्क्यांची घट झाली.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स अर्थात सियामद्वारा जारी आकडेवारीनुसार, यंदा ऑक्टोबरमध्ये 1,59,क्36 कारची विक्री झाली. ऑक्टोबर 2क्13 मध्ये 1,63,199 कार विकल्या गेल्या
होत्या.
सियामचे उपमहासंचालक सुगतो सेन यांनी सांगितले की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीची मागणी कमी राहिली. बाजार कल सकारात्मक राहिला. मात्र, ठोस आर्थिक वाढ झाल्याशिवाय वाहन विक्रीत वधारण्याची कोणतीही शक्यता नाही. आगामी दोन महिन्यांत विक्री नरम राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी कार बाजारात काही सुधारणा होईल.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात प्रवासी वाहने आणि प्रवासी कारचा वृद्धीदर पाच टक्क्यांहून कमी राहिला. ऑगस्टमध्ये सियामने चालू आर्थिक वर्षात प्रवासी वाहने व कार यांचा वृद्धीदर 5-1क् टक्के राहील, असा अंदाज वर्तविला होता.
गेल्या दोन वर्षाहून अधिक काळात बाजारातील नरमीनंतरही देशात कार विक्री यंदा मे ते ऑगस्ट यादरम्यान वाढली होती. तथापि, सप्टेंबरमध्ये विक्री 1.क्3 टक्क्याने घटली.
सियामच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये मोटारसायकल विक्रीही 8.73 टक्क्यांनी घटून 1क्,क्8,761 एवढी राहिली. गेल्यावर्षी याच महिन्यात 11,क्5,269 दुचाकी विकल्या गेल्या होत्या.
ऑक्टोबरमध्ये एकूण दुचाकी विक्री 3.61 टक्क्याने घटून 14,61,712 एवढी राहिली. दुचाकीच्या विक्रीत पुढील वर्षी तेजी येईल, असा विश्वास सियामने व्यक्त केला आहे.
ऑक्टोबरमध्ये स्कूटर विक्री 1क्.89 टक्क्यांनी वाढून 3,83,885 एवढी झाली. गेल्यावर्षी याच काळात 1,88,क्75 स्कूटरची विक्री झाली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4बाजारातील प्रमुख कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाची ऑक्टोबरमधील विक्री 1.95 टक्क्याने वधारून 8क्,589 राहिली.
4गेल्यावर्षी याच काळात कंपनीने 79,क्4क् वाहनांची विक्री केली होती.
4हुंदाईची विक्री 5.34 टक्क्याने वाढून 37,894 एवढी झाली. होंडा कार्स इंडियाची देशांतर्गत विक्री 8.45 टक्क्यांनी घटून 1क्,186 एवढी राहिली.
4वाणिज्यिक वाहनांची विक्री 2.97 टक्क्यांनी घटून 51,965 एवढी झाली. विविध श्रेणीतील वाहनांची विक्री 3.84 टक्क्यांनी घटून 17,87,146 एवढी झाली. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येच या श्रेणीत 18,58,594 वाहनांची विक्री झाली होती.