Lokmat Money > बिझनेस न्यूज > कारविक्री वधारली, फेब्रुवारीत ६.८५ टक्क्यांची वाढ

कारविक्री वधारली, फेब्रुवारीत ६.८५ टक्क्यांची वाढ

भारतात कारची विक्री फेब्रुवारी महिन्यात ६.८५ टक्क्यांनी वाढली. यातून ग्राहकांच्या दृष्टिकोनातील बदल स्पष्ट दिसतो. चालू

By admin | Updated: March 10, 2015 23:45 IST2015-03-10T23:45:48+5:302015-03-10T23:45:48+5:30

भारतात कारची विक्री फेब्रुवारी महिन्यात ६.८५ टक्क्यांनी वाढली. यातून ग्राहकांच्या दृष्टिकोनातील बदल स्पष्ट दिसतो. चालू

Car sales up 6.85 percent in February | कारविक्री वधारली, फेब्रुवारीत ६.८५ टक्क्यांची वाढ

कारविक्री वधारली, फेब्रुवारीत ६.८५ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : भारतात कारची विक्री फेब्रुवारी महिन्यात ६.८५ टक्क्यांनी वाढली. यातून ग्राहकांच्या दृष्टिकोनातील बदल स्पष्ट दिसतो. चालू आर्थिक वर्षात कारविक्री एक आकडी वाढीसह सकारात्मक स्थितीत कायम राहील, अशी आशा सियाम या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे. दुसरीकडे दुचाकींच्या विक्रीत घट दिसून आली.
सोसायटी आॅफ इंडियन अ‍ॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सने (सियाम) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कारविक्री गेल्या महिन्यात ६.८५ टक्क्यांनी वाढून एकूण १,७१,७२७ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १,६०,७१७ कार विकल्या गेल्या होत्या. सियामचे उपमहासंचालक सुगातो सेन म्हणाले की, कारविक्रीतील वाढीचा हा प्रवाह कायम राहील अशी आशा आहे. नकारात्मक दृष्टिकोनामुळे कारविक्रीवर विपरीत परिणाम होत होता; मात्र ही स्थिती आता बदलली आहे. मार्च महिन्यात चांगली विक्री होत असते. त्यामुळे या महिन्यातील विक्री फेब्रुवारीच्या तुलनेत वाढायला हवी. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाय करण्यात आले असून, त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या वाहनाची मागणी वाढण्याची आशा असल्याचे सेन म्हणाले. मनरेगाच्या अंतर्गत रोजगार व इतर प्रकारच्या उपाययोजनांमुळे ग्रामीण भागातील उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे मोटारसायकलची मागणी वाढण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Car sales up 6.85 percent in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.