नवी दिल्ली : २0१५-१६ या आर्थिक वर्षात भारतातील कारविक्रीने टॉप गीअर टाकल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. या वर्षात कारविक्री ७.८७ टक्क्यांनी वाढली. हा गेल्या वर्षातील उच्चांक ठरला. आव्हानात्मक परिस्थितीत नवे मॉडेल आणि आकर्षक सवलती यांच्या माध्यमातून कार उद्योगाने मार्ग काढला.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जारी केलेल्या माहितीनुसार, २0१५-१६ या आर्थिक वर्षात २0,२५,४७९ कारची विक्री झाली. २0१४-१५ या वर्षात १८,७७,७0६ कारची विक्री झाली
होती.
सियामचे उप महासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले की, या आधी २0१0-११ मध्ये कारविक्रीत २९.0८ टक्क्यांची वाढ झाली होती. २0१५-१६ हे वर्ष वाहन उद्योगासाठी खरे तर खडतर होते. तथापि, नवे मॉडेल सादर करून आणि आकर्षक सूट योजना राबवून कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळविले.
चढे व्याजदर, अस्थाई धोरणे आणि ग्राहकांचा नरमाईचा कल ही आव्हाने उद्योगासमोर होती. अस्थायी धोरणांमुळे डिझेल कार उद्योगास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वस्तू उत्पादन क्षेत्रांपैकी सर्वाधिक कर वाहन उद्योगाकडून येतो. तथापि, या उद्योगाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. आजघडीला या क्षेत्रातील केवळ ६0 टक्के क्षमतेचाच वापर होतो.
भारतात कार विक्रीचा टॉप गीअर; ७.८ टक्के वाढ!
२0१५-१६ या आर्थिक वर्षात भारतातील कारविक्रीने टॉप गीअर टाकल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. या वर्षात कारविक्री ७.८७ टक्क्यांनी वाढली.
By admin | Updated: April 8, 2016 22:37 IST2016-04-08T22:37:29+5:302016-04-08T22:37:29+5:30
२0१५-१६ या आर्थिक वर्षात भारतातील कारविक्रीने टॉप गीअर टाकल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. या वर्षात कारविक्री ७.८७ टक्क्यांनी वाढली.
