Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीयांचे दरडोई कर्ज प्रचंड वाढले

भारतीयांचे दरडोई कर्ज प्रचंड वाढले

आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी विकास खर्च वाढल्याने भारतातील दरडोई कर्जाचा बोजा २०१४-१५ मध्ये २ हजार ९६६ रुपयांनी वाढत ४४,०९५

By admin | Updated: July 26, 2015 22:48 IST2015-07-26T22:48:27+5:302015-07-26T22:48:51+5:30

आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी विकास खर्च वाढल्याने भारतातील दरडोई कर्जाचा बोजा २०१४-१५ मध्ये २ हजार ९६६ रुपयांनी वाढत ४४,०९५

The per capita debt of Indians increased tremendously | भारतीयांचे दरडोई कर्ज प्रचंड वाढले

भारतीयांचे दरडोई कर्ज प्रचंड वाढले

नवी दिल्ली : आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी विकास खर्च वाढल्याने भारतातील दरडोई कर्जाचा बोजा २०१४-१५ मध्ये २ हजार ९६६ रुपयांनी वाढत ४४,०९५ रुपयांवर गेला आहे. २०१३-१४ मध्ये दरडोई कर्जाचा आकडा ४१,१२९ रुपये
होता.
सरकारी प्राथमिक लेखा परीक्षणानुसार कर्जाच्या ओझ्यात देशी-विदेशी कर्जाशिवाय इतर देणींचाही समावेश आहे. सरकारवरील कर्जासंबंधीच्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार एकूण २० विकसनशील देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत सरकारने देशांतर्गत कर्जावरील व्याजापोटी २०१२-१३ मध्ये ४.०४ लाख कोटी, २०१३-१४ मध्ये ४.८५ लाख कोटी आणि २०१४-१५ मध्ये ५.५६ लाख कोटी रुपये खर्च केले. या तीन आर्थिक वर्षात विदेशी कर्जावरील व्याजापोटी क्रमश: ३७.२ कोटी डॉलर, ३६.६ कोटी डॉलर आणि ३८.९ कोटी डॉलर खर्च करण्यात आले.

Web Title: The per capita debt of Indians increased tremendously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.