मुंबई : येत्या पाच वर्षांत बंदरांची क्षमता सध्याच्या ८०० दशलक्ष मेट्रिक टनावरून दुप्पट, म्हणजेच १६०० दशलक्ष मेट्रिक टन इतकी करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबईत सोमवारी आयोजित बंदर विकासासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जहाज बांधणी मंत्रालयाचे सचिव विश्वपती त्रिवेदी, महासंचालक गौतम चटर्जी, सल्लागार आशिष सिन्हा, संयुक्त सचिव एन. मुरुगानंदन आदी उपस्थित होते. शिवाय सर्व प्रमुख १२ बंदरांचे प्रमुख उपस्थित होते.
सर्व प्रमुख १२ बंदरांनी याआधीच ५०० दशलक्ष मेट्रिक टन क्षमतेच्या वाढीसाठी कृती आराखडा तयार केला असून, त्यापैकी ३५० दशलक्ष मेट्रिक टन प्रकल्पांची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात होईल.
बंदरे आणि रस्ते देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, या क्षेत्रांचा योग्य क्षमतेने विकास केला, तर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) २ टक्के वाढ होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बंदर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रेल्वे जोडणी पर्यायाची चाचपणी केली जाईल. रो-रो (रोल आॅन-रोल आॅफ) सेवा देखील वाहतूक कोंडी टाळण्याचा उपाय ठरू
शकेल.
बंदर जोडणी रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी बंदरांच्या सहभागाने एसपीव्ही अर्थात विशेष हेतू वाहने तयार करायलाही सरकार अनुकूल आहे, असेही नितीन गडकरी यांनी याप्रसंगी स्पष्टपणे नमूद केले.
(प्रतिनिधी)०
बंदरांची क्षमता दुपटीने वाढविणार
मुंबईत सोमवारी आयोजित बंदर विकासासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
By admin | Updated: July 29, 2014 01:43 IST2014-07-29T01:43:56+5:302014-07-29T01:43:56+5:30
मुंबईत सोमवारी आयोजित बंदर विकासासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.
