मुंबई : चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवल्याने रुपयाच्या विनिमय दरात होणाऱ्या मोठ्या चढ-उतारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर रुपयाच्या विनिमय दरात होणाऱ्या मोठ्या चढ-उतारापासून गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
उद्योग जगतातर्फे आयोजित एका परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था व्यापक दृष्टीने स्थिर राहावी या दृष्टीने आम्ही उद्दिष्ट निश्चित केले आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी चिंता वाटावी असा विनिमय दर असला पाहिजे. यापूर्वी असा चढ-उतार कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला आहे. जर आम्ही चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवला आणि त्यावर नियंत्रण मिळविले तर जगातील अन्य चलनांच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. विनिमय दरात होणारा चढ-उतार इतिहासजमा होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
या वेळी त्यांनी देशातील बँकिंग प्रणाली आणखी वेगवान करण्यावरही भर दिला आणि या संदर्भात पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारताकडे बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात मोठी उडी मारण्यासाठी बरेच काही आहे.
आम्हाला जागतिक परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा. आम्ही क्रांती करण्याच्या काठावर आहोत. आपल्या उद्योगांना त्यांचा रस्ता शोधण्यासाठी आम्ही मदत केली पाहिजे. उद्योगांना वाट्टेल तेथे जाण्याची सवलत दिली पाहिजे. तसे औद्योगिक वातावरण तयार केले पाहिजे.
अलीकडे शेअर बाजाराच्या घसरणीबरोबरच रुपयाही अस्थिर बनला आहे. तो सातत्याने घसरताना दिसून येत आहे.
रुपया नियंत्रणात ठेवणे शक्य
चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवल्याने रुपयाच्या विनिमय दरात होणाऱ्या मोठ्या चढ-उतारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी सांगितले
By admin | Updated: April 8, 2016 03:15 IST2016-04-08T03:15:15+5:302016-04-08T03:15:15+5:30
चलनवाढीचा दर ४ टक्क्यांच्या आसपास ठेवल्याने रुपयाच्या विनिमय दरात होणाऱ्या मोठ्या चढ-उतारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी सांगितले
