नवी दिल्ली : बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी मोबाईल कॉल दर योजनेतहत मोबाईल कॉल दर ८० टक्क्यांपर्यंत घटविले आहेत. अर्थात, ही सवलत पहिल्या दोन महिन्यांसाठीच लागू राहील.
बीएसएनएलचे चेअरमन व प्रबंध संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, कंपनीने आपला पायाभूत आराखडा ठीकठाक केला असून, नवीन ग्राहकांसाठी पहिल्या दोन महिन्यांसाठी कॉल दर ८० टक्क्यांपर्यंत घटविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या चांगल्या सेवेचा त्यांना अनुभव घेता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
ते म्हणाले की, हे कॉल दर प्रतिमिनिट आणि प्रतिसेकंद या दोन्ही बिलिंग प्लानमध्ये घटविण्यात आले आहेत. कनेक्शन घेतल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांसाठी ते लागू राहतील. नवीन ग्राहकांना कनेक्शन घेण्यासाठी प्रतिसेकंद प्लानसाठी ३६ रुपये आणि प्रतिमिनिट प्लानसाठी ३७ रुपयांचे व्हाऊचर खरेदी करावे लागेल.
जे ग्राहक ३७ रुपयांची योजना निवडतील, त्यांना बीएसएनएलच्या क्रमांकावर लोकल आणि एसटीडी कॉलसाठी १० पैसे प्रतिमिनिट आकारण्यात येतील. याच योजनेतील ग्राहकांनी अन्य नेटवर्कवर कॉल केल्यास ३० पैसे प्रतिमिनिट आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ३६ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांकडून बीएसएनएलच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या लोकल व एसटीडी कॉलसाठी तीन सेकंदांसाठी एक पैसा आणि दुसऱ्या नेटवर्कसाठी तीन सेकंदांसाठी २ पैसे चार्ज लागेल.
बीएसएनएलने घटविले नवीन ग्राहकांसाठी कॉल दर
बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी मोबाईल कॉल दर योजनेतहत मोबाईल कॉल दर ८० टक्क्यांपर्यंत घटविले आहेत.
By admin | Updated: December 20, 2015 22:33 IST2015-12-20T22:33:50+5:302015-12-20T22:33:50+5:30
बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी मोबाईल कॉल दर योजनेतहत मोबाईल कॉल दर ८० टक्क्यांपर्यंत घटविले आहेत.
