Lokmat Money > बिझनेस न्यूज > एमएफकडून ६,००० कोटींची शेअर खरेदी

एमएफकडून ६,००० कोटींची शेअर खरेदी

बाजार कल सुधारल्याने म्युच्युअल फंड कंपन्यांनी आॅगस्टमध्ये सुमारे ६,००० कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली.

By admin | Updated: September 1, 2014 00:36 IST2014-09-01T00:36:41+5:302014-09-01T00:36:41+5:30

बाजार कल सुधारल्याने म्युच्युअल फंड कंपन्यांनी आॅगस्टमध्ये सुमारे ६,००० कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली.

Buy shares worth Rs 6,000 crore from MF | एमएफकडून ६,००० कोटींची शेअर खरेदी

एमएफकडून ६,००० कोटींची शेअर खरेदी

नवी दिल्ली : बाजार कल सुधारल्याने म्युच्युअल फंड कंपन्यांनी आॅगस्टमध्ये सुमारे ६,००० कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या साडेसहा वर्षांतील ही सर्वाधिक मासिक खरेदी आहे.
सलग चौथ्या महिन्यात म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराला प्राधान्य दिले गेले. याशिवाय म्युच्युअल फंड कंपन्यांनी याच काळात बाँड बाजारातही ६६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी फंड कंपन्यांनी जुलैमध्ये ५,००० कोटी रुपये, जूनमध्ये ३,३४० कोटी आणि मेमध्ये १०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Buy shares worth Rs 6,000 crore from MF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.