Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यापा-यांनीच काय ते ठरवावे !

व्यापा-यांनीच काय ते ठरवावे !

विरोधी पक्षात बसल्यानंतर आम्ही एलबीटी रद्द करू, टोल बंद करू असे सांगता येते. परंतु, सरकारमध्ये बसल्यावर खरे प्रश्न कळतात

By admin | Updated: November 21, 2014 02:16 IST2014-11-21T02:16:03+5:302014-11-21T02:16:03+5:30

विरोधी पक्षात बसल्यानंतर आम्ही एलबीटी रद्द करू, टोल बंद करू असे सांगता येते. परंतु, सरकारमध्ये बसल्यावर खरे प्रश्न कळतात

Businessmen decide what to do! | व्यापा-यांनीच काय ते ठरवावे !

व्यापा-यांनीच काय ते ठरवावे !

पुणे : विरोधी पक्षात बसल्यानंतर आम्ही एलबीटी रद्द करू, टोल बंद करू असे सांगता येते. परंतु, सरकारमध्ये बसल्यावर खरे प्रश्न कळतात. आता केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) निर्णय घेतल्यानंतरच एलबीटीचे धोरण जाहीर करू, असे भाजपा सरकारकडून सांगितले जात आहे. त्यामुळे यापुढे व्यापाऱ्यांनीच काय ते ठरवावे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
सावित्रीबाई पुणे विद्यापीठात शालेय व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याशी महाराष्ट्र आॅलिम्पिक असोशिएशनच्या (एमओए) विविध प्रश्नांवर एमओएचे अध्यक्ष अजित पवार यांनी चर्चा केली. त्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला नव्हता. वारंवार निवडणुकीला सामोरे जाणे महाराष्ट्राला परवडणारे नाही.
राज्यात स्थिर सरकार असावे, या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देऊ केला आहे. ही वस्तुस्थिती मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगू इच्छितो.
ज्या कोणाच्या चौकशा त्यांच्या सरकारला करायच्या असतील त्यांनी कराव्यात, दोषींवर आपोआप कारवाई होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Businessmen decide what to do!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.