Lokmat Money > बिझनेस न्यूज > सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

जागतिक बाजारातील तेजी आणि दागिने निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी या बळावर सोन्या-चांदीचा भाव बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढला

By admin | Updated: June 11, 2015 00:13 IST2015-06-11T00:13:56+5:302015-06-11T00:13:56+5:30

जागतिक बाजारातील तेजी आणि दागिने निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी या बळावर सोन्या-चांदीचा भाव बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढला

Bullion market rally for the third straight day | सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि दागिने निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी या बळावर सोन्या-चांदीचा भाव बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढला. सोन्याचा भाव १00 रुपयांनी वाढून २७,१५0 रुपये तोळा झाला. चांदीचा भाव ५00 रुपयांनी वाढून ३७,८00 रुपये किलो झाला.
औद्योगिक क्षेत्रातील मागणीचा लाभ चांदीला मिळाला. सोन्याला जागतिक बाजारातील तेजीचा लाभ प्रामुख्याने मिळाला. सिंगापुरात सोन्याचा भाव 0.४ टक्क्यांनी वाढून ११८१.0४ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.४ टक्क्यांनी वाढून १६.0८ डॉलर प्रति औंस झाला.
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धता आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १00 रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,१५0 रुपये आणि २७,000 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. ८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव मात्र आदल्या सत्राच्या पातळीवर २३,४00 रुपये असा कायम राहिला.
तयार चांदीचा भाव ५00 रुपयांनी वाढून ३७,८00 रुपये किलो झाला. मागणीच्या अभावामुळे साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ४५ रुपयांनी घसरून ३६,८९५ रुपये झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ५४,000 रुपये आणि विक्रीसाठी ५५,000 रुपये असा कायम राहिला. (वृत्तसंस्था)

Web Title: Bullion market rally for the third straight day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.