पवेल : चाळीत स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून मनोज धुमाळ नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने कोट्यवधींची कमाई केली. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने एकालाही घर दिले नाहीच, त्याचबरोबर ग्राहकांना पैसे परत देण्यासही तो टाळाटाळ करीत आहे. याप्रकरणी ग्राहकांनी पोलीस तक्रार केली असता, सर्वांचे पैसे परत देतो, असे त्याने पोलिसांसमक्ष सांगितले. मात्र अद्याप एकालाही पैसे परत दिलेले नाही. उसुर्ली बुद्रुक येथे मनोज धुमाळ नावाच्या बिल्डरने २०१२ साली गृहनिर्माण प्रकल्पाची जाहिरात केली होती. चाळीत स्वस्त घरे देऊ, असे सांगून जवळपास अडीचशेपेक्षा जास्त ग्राहकांकडून पैसे घेतले. ती जागा कमी असल्याने तिथे घर देणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घर हवे असल्यास जास्त पैसे भरा, असे सांगून तो ग्राहकांची दिशाभूल करीत आहे.गेली तीन वर्षे धुमाळ हेलपाटे मारायला लावत असल्याचे अशोक पवार या फसलेल्या ग्राहकाने सांगितले. फसवणूक झालेल्या अनेक ग्राहकांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्र ारी केल्या आहेत. पोलिसांनी बोलावले की पैसे देतो, असे सांगत बनाव करून सुटका करून घेत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. २९ एप्रिल रोजी त्याने काही ग्राहकांना पोलीस ठाण्याच्या बाहेर भेटून ११ मेपर्यंत पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची एक प्रत पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र त्याने ना पैसे दिले ना कोणाशी संवाद साधला.चौकटफसवणूक झालेले अल्प उत्पादन गटातीलसाडेचार लाखांत साडेतीनशे चौरस फुटांचे घर, अशी जाहिरात धुमाळने केली होती. त्यापैकी अर्धे पैसे रोख व निम्मे लोन करून घेण्याची त्याची योजना होती. अल्पउत्पादन गटातील पैसे दिले. त्यातून त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. ......मनोज धुमाळबाबत आमच्याकडे तक्र ार आली आहे. त्यानुसार त्याला समज दिली असून त्याने काही ग्राहकांचे पैसे परत केले आहेत. जर धुमाळने पैसे दिले नाहीत तर त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल.-जनार्दन थोरातवरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे
बांधकाम व्यावसायिकाने फसवले
पनवेल : चाळीत स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून मनोज धुमाळ नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने कोट्यवधींची कमाई केली. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने एकालाही घर दिले नाहीच, त्याचबरोबर ग्राहकांना पैसे परत देण्यासही तो टाळाटाळ करीत आहे. याप्रकरणी ग्राहकांनी पोलीस तक्रार केली असता, सर्वांचे पैसे परत देतो, असे त्याने पोलिसांसमक्ष सांगितले. मात्र अद्याप एकालाही पैसे परत दिलेले नाही.
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:37+5:302015-07-10T23:13:37+5:30
पनवेल : चाळीत स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून मनोज धुमाळ नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने कोट्यवधींची कमाई केली. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने एकालाही घर दिले नाहीच, त्याचबरोबर ग्राहकांना पैसे परत देण्यासही तो टाळाटाळ करीत आहे. याप्रकरणी ग्राहकांनी पोलीस तक्रार केली असता, सर्वांचे पैसे परत देतो, असे त्याने पोलिसांसमक्ष सांगितले. मात्र अद्याप एकालाही पैसे परत दिलेले नाही.
