Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसएनएल नाशिकमध्ये क्वॉटर्स भाड्याने देणार

बीएसएनएल नाशिकमध्ये क्वॉटर्स भाड्याने देणार

नाटककार वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट नाटकामध्ये ‘घर देता का घर’ या गाजलेल्या संवादाची अनेकदा घर शोधणा-यांकडून आठवण केली जाते

By admin | Updated: October 13, 2014 02:38 IST2014-10-13T02:38:10+5:302014-10-13T02:38:10+5:30

नाटककार वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट नाटकामध्ये ‘घर देता का घर’ या गाजलेल्या संवादाची अनेकदा घर शोधणा-यांकडून आठवण केली जाते

BSNL will hire quarters in Nashik | बीएसएनएल नाशिकमध्ये क्वॉटर्स भाड्याने देणार

बीएसएनएल नाशिकमध्ये क्वॉटर्स भाड्याने देणार

नाशिक : नाटककार वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट नाटकामध्ये ‘घर देता का घर’ या गाजलेल्या संवादाची अनेकदा घर शोधणा-यांकडून आठवण केली जाते; परंतु सध्या नाशिक बीएसएनएलने आपल्या मालकीची घरे भाड्याने देण्यासाठी ‘घर घेता का घर’ अशी विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. २०४ घरांसह निगमची जागाही भाड्याने देण्यात येणार आहे.
बीएसएनएलची घरे किंवा मालमत्ता राष्ट्रीयीकृत बँका, केंद्र किंवा राज्य सरकारच्या कार्यालयांनाच भाड्याने देण्यात येणार आहेत. पर्यायी स्रोत म्हणून निगमची मालमत्ता भाड्याने देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर अशा प्रकारे मालमत्ता भाड्याने देण्यास सुरुवात झाली. आडगाव पोलीस ठाणे व देना बँकेस जागा देण्यात आली. आता अशाच प्रकारे अन्य अतिरिक्त जागा, तसेच रिकामी असलेली निवासस्थाने भाड्याने देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लासलगाव, मालेगाव, मुसळगाव, तसेच शहरातील सातपूर औद्योगिक वसाहत, दत्त मंदिर, देवळाली कॅम्प, जीपीओ कॅम्पस, जेल रोड, मखमलाबाद, पंचवटी येथील अतिरिक्त जागा भाड्याने देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना निवासस्थानांची गरज भासते. निगमने त्याच गरजेतून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्वॉटर्स आणि बंगले बांधले; मात्र आता निगमच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी स्वमालकीची घरे घेतली असल्याने ही घरे रिकामी पडून आहेत. दुसरीकडे अन्य बदली अधिकाऱ्यांना घरे मिळत नसल्याने त्यांना खासगी इमारतींमध्ये भाड्याने राहावे लागते. (प्रतिनिधी)

Web Title: BSNL will hire quarters in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.