नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. उद्या सोमवारपासून बीएसएनएल ग्राहकांना राष्ट्रीय रोमिंग सेवा विनामूल्य वापरता येईल. यामुळे देशभर कंपनीच्या ग्राहकांना इनकमिंग कॉल्ससाठी पैसे मोजावे लागणार नाही.
बीएसएनएलचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी रविवारी याबाबतची माहिती जारी केली. सोमवारपासून(१५जून) बीएसएनएल ग्राहकांना रोमिंगदरम्यान अनेक हॅण्डसेट वा सीमकार्ड बाळगण्याची गरज नाही. इनकमिंग कॉल्सवरही रोमिंगदरम्यान ते विनामूल्य बोलू शकतील. प्रत्यक्षात हे ‘एक राष्ट्र, एक नंबर’चे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.गत २ जूनला दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची घोषणा केली होती.
आजपासून बीएसएनएलचे रोमिंग फ्री
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. उद्या सोमवारपासून बीएसएनएल ग्राहकांना राष्ट्रीय रोमिंग सेवा
By admin | Updated: June 15, 2015 00:58 IST2015-06-15T00:58:10+5:302015-06-15T00:58:10+5:30
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. उद्या सोमवारपासून बीएसएनएल ग्राहकांना राष्ट्रीय रोमिंग सेवा
