नवी दिल्ली : सरकारच्या मालकीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) २४९ रुपयांत वायरलाइन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्याची योजना आणण्यात येत आहे. या योजनेनुसार, एका महिन्यात ३00 जीबी डाटा वापरल्यास १ जीबी डाटा डाऊनलोड करण्याची किंमत फक्त १ रुपया पडणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या ५0 रुपयांत १ जीबी ४-जी डाटा देण्याच्या योजनेला बीएसएनएलची ही प्रस्तावित योजना टक्कर देऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. बीएसएनएलचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘एक्सरिएन्स अनलिमिटेड बीबी २४९’ या नावाने ही योजना आणण्यात येत आहे. ९ सप्टेंबर रोजी तिचा शुभारंभ होणार आहे. या योजनेमुळे ग्राहक मोबाइल इंटरनेटकडून वायरलाइन इंटरनेटकडे वळतील, असे बीएसएनएलला वाटते. इंटरनेटची गती २ एमबीएएस असेल. ग्राहकांनी महिनाभरात नियमितपणे सेवा वापरल्यास ३00 जीबी डाटा डाऊनलोड केला जाऊ शकेल. त्यासाठी त्यांना फक्त २४९ रुपये द्यावे लागतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बीएसएनएल देणार सर्वांत स्वस्त ब्रॉडबँड
सरकारच्या मालकीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) २४९ रुपयांत वायरलाइन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्याची योजना आणण्यात येत आहे.
By admin | Updated: September 7, 2016 04:09 IST2016-09-07T04:09:54+5:302016-09-07T04:09:54+5:30
सरकारच्या मालकीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) २४९ रुपयांत वायरलाइन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्याची योजना आणण्यात येत आहे.
