Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसईचा सेन्सेक्स १0५ अंकांनी कोसळला

बीएसईचा सेन्सेक्स १0५ अंकांनी कोसळला

आयटी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने शुक्रवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0५ अंकांनी घसरून २८,४५८.१0 अंकांवर बंद झाला.

By admin | Updated: December 6, 2014 01:51 IST2014-12-06T01:51:22+5:302014-12-06T01:51:22+5:30

आयटी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने शुक्रवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0५ अंकांनी घसरून २८,४५८.१0 अंकांवर बंद झाला.

BSE Sensex down 105 points in early trade | बीएसईचा सेन्सेक्स १0५ अंकांनी कोसळला

बीएसईचा सेन्सेक्स १0५ अंकांनी कोसळला

मुंबई : आयटी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने शुक्रवारी शेअर बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0५ अंकांनी घसरून २८,४५८.१0 अंकांवर बंद झाला.
ब्रोकरांनी सांगितले की, बीएसई सेन्सेक्स पुढील हालचालींपूर्वी २८,000 ते २९,000 अंकांच्या मध्ये स्थिर होईल, असा अंदाज आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्समधील आयटीसी, एमअँडएम आणि सेसा स्टरलाईट यासारख्या बड्या कंपन्यांचे समभाग वर चढले. आयटीसी, इन्फोसिस, विप्रो, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब आणि सिप्ला या कंपन्यांचे समभाग मात्र कोसळले.
दुसऱ्या श्रेणीतील कंपन्यांच्या समभागांनाही नफा वसुलीचा फटका बसला. छोट्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्यामुळे या कंपन्यांचे समभाग घसरले.
सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स तेजीने उघडला. नंतर तो २८,६५१.७५ पर्यंत वर चढला; मात्र मध्यंतरानंतर सेन्सेक्स घसरणीला लागला. सत्राअखेरीस १0४.७२ अंकांची अथवा 0.३७ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,४५८.१0 अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्सने १२0.११ अंकांची अथवा 0.४२ टक्क्यांची वाढ नोंदविली होती.
या संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स २३६ अंकांनी कोसळला. तब्बल सात आठवड्यांनंतर सेन्सेक्सची साप्ताहिक घसरण झाली आहे.
५0 कंपन्यांचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी २६.१0 अंकांनी अथवा 0.३0 टक्क्यांनी कोसळला. निफ्टी ८,५३८.३0 अंकांवर बंद झाला.
नोव्हेंबरमध्ये भारताच्या वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्राने चीनला मागे टाकून विक्रमी वाढ नोंदविली आहे.
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काल ४७४ कोटी रुपयांची शेअर खरेदी केली असल्याचे शेअर बाजाराकडून जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. आशियातील बाजारांपैकी चीनच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली. चीन सरकारने खर्च कपातीसाठी बँकिंग क्षेत्रात नियंत्रक नेमण्याची घोषणा केल्यामुळे बाजाराला बळ मिळाले. चीनसह हाँगकाँग, जपान आणि सिंगापूर येथील बाजार 0.१९ टक्के ते १.३२ टक्के वाढले. तैवानचा बाजार मात्र 0.२0 टक्क्यांनी खाली आला. (वृत्तसंस्था)

Web Title: BSE Sensex down 105 points in early trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.