मुंबई : इंडिकॅश ब्रँडने व्हाईट लेबल एटीएम चालविणारी टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्यूशन्सचे म्हणणे असे आहे की, बँकेद्वारे चालविली जाणारी एटीएम (ब्राऊन लेबल) सेवा लवकरच इतिहासजमा होणार आहे. कारण ही सेवा आता जवळपास तिसऱ्या पक्षाकडून दिली जाण्याकडे निघाली आहे.
व्हाईट लेबल एटीएम विभागात टाटा समूहाचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या २० राज्यांत सात हजार मशीन्स असून तेथेच कंपनीच्या ब्राऊन लेबल मशीनची संख्या १३ हजारांपेक्षा जास्त आहे. या सात हजार मशीन्सपैकी चार हजार मशीन्स अशा ठिकाणी आहेत जेथे बँकेची सेवाच उपलब्ध नाही. देशात एकूण २ लाख एटीएममध्ये कंपनीचा वाटा १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एकूण एटीएममध्ये १.९ लाख ब्राऊन लेबल एटीएम आहेत. कंपनीच्या व्हाईट लेबल एटीएममध्ये गेल्या वर्षभरात दुपटीने वाढ झाली. सध्या व्हाईट लेबल एटीएमची संख्या ११ हजार आहे. हे एटीएम तीन कंपन्यांनी लावले असून त्यांना रिझर्व्ह बँकेने तशी परवानगी दिलेली आहे.
टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्सुशन्सचे मुख्य कार्यकारी संजीव पटेल म्हणाले की, गेल्या वर्षभरात विशेषत: खासगी बँकांशी एटीएम सेवा मिळण्यासाठी करार झाले आहेत. या दरम्यान खासगी बँकांनी स्वत: एकही एटीएम मशीन लावलेली नाही. एवढेच काय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही फार मोठ्या संख्येने एटीएम मशीन लावलेल्या नाहीत. बँकांनी स्वत: एटीएम मशीन्स लावणे हे खूपच खर्चिक बनले आहे. दुसरे व्हार्ईट लेबल एटीएम मशीन उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये गुंतवावे लागतात. ब्राऊन लेबल एटीएमची गुंतवणूक किती तरी पट जास्त आहे. कारण त्यात भाड्याचा मोठा वाटा आहे.
ब्राऊन लेबल एटीएम लवकरच इतिहासजमा
इंडिकॅश ब्रँडने व्हाईट लेबल एटीएम चालविणारी टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्यूशन्सचे म्हणणे असे आहे की, बँकेद्वारे चालविली जाणारी एटीएम (ब्राऊन लेबल) सेवा लवकरच
By admin | Updated: November 30, 2015 00:51 IST2015-11-30T00:51:10+5:302015-11-30T00:51:10+5:30
इंडिकॅश ब्रँडने व्हाईट लेबल एटीएम चालविणारी टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्यूशन्सचे म्हणणे असे आहे की, बँकेद्वारे चालविली जाणारी एटीएम (ब्राऊन लेबल) सेवा लवकरच
