नवी दिल्ली : जागतिक बाजारात उठाव नसल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने दहा ग्रॅममागे २०० रुपयांनी खाली येऊन २५,३५० रुपये झाले. चांदी किलोमागे ४५० रुपयांनी स्वस्त होऊन ३३,७०० रुपयांवर आली.
जागतिक बाजारात सोन्याला मंदी असल्यामुळे ते पाच वर्षांपूर्वीच्या पातळीवर पोहोचले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जॅनेट येलेन यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था या महिन्यात व्याजदर वाढविण्याइतकी बळकट असल्याचे संकेत दिले आहेत.
या संकेतांमुळे सोन्यावर दडपण वाढले. सिंगापूरच्या बाजारात औंसमागे ०.७ टक्क्यांची घट होऊन ते १,०४६.४४ अमेरिकन डॉलर झाले. फेब्रुवारी २०१० नंतरचा हा सगळ्यात कमी भाव आहे. चांदी औंसमागे १.२ टक्क्यांनी स्वस्त होऊन १३.८४ अमेरिकन डॉलर झाली.
चांदीचा हा भाव फेब्रुवारी २००९ नंतरचा सगळ्यात कमी आहे. लंडनमध्ये सोने औंसमागे ०.३९ टक्के खाली येऊन १,०४९.१० अमेरिकन डॉलरवर आले.
दिल्लीत तयार चांदी किलोमागे ४५० रुपयांनी खाली येऊन
३३,७०० रुपये व वीकली बेसड् डिलिव्हरीची चांदी किलोमागे
३३५ रुपयांनी स्वस्त होऊन
३३,२४० रुपयांवर आली. चांदीच्या १०० नाण्यांचा भावही उतरून खरेदीसाठी ४७,००० व विक्रीसाठी ४८,००० रुपये होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावाची चमक दुसऱ्या दिवशीही उतरली
जागतिक बाजारात उठाव नसल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने दहा ग्रॅममागे २०० रुपयांनी खाली येऊन २५,३५० रुपये झाले. चांदी किलोमागे ४५० रुपयांनी
By admin | Updated: December 4, 2015 01:43 IST2015-12-04T01:43:48+5:302015-12-04T01:43:48+5:30
जागतिक बाजारात उठाव नसल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने दहा ग्रॅममागे २०० रुपयांनी खाली येऊन २५,३५० रुपये झाले. चांदी किलोमागे ४५० रुपयांनी
