Lokmat Money > बिझनेस न्यूज > वधू शोध (लोकमंच)

वधू शोध (लोकमंच)

भूतकाळात वधूशोध पहाणेचे काम चैत्र वैशाख या दोन महिन्यात धूम धडाक्यात चालूअसायचे. रस्ते नव्हते वाहणे नव्हती, पायवाटा तुडवून-तुडवून वर पक्षाच्या चपला तुटायच्या आणि पायांचे पारवे व्हायचे. वधू वयाने लहान असेल तरीही नाविलाजाने पंसती करायची वधूला वराकडून देणगी म्हणून धान्य-गुळाचे रवे आणिपैसे, कपडे देऊ करायचे आणि मग विवाह व्हायचे आता वर्तनामन काळ विज्ञानाचा सुखाचा समृद्धीचा चालूआहे. या काळाच्या सुरूवातीला वधूकडून वरास हुंडा रुपाने देणगी, पैसे, पेहरावा,गाडी घोडा म्हणेल ते द्यायचे आणि वधूवरांकडून पंसत व्हायची असाही काळ वीस एक वर्षे चालला. आणि इ।। सन २००० साल उजाडले आणि पूर्वपदावर काळ आला तो वधू शोधण्याचा ज्यांनी वधू शोधण्याचा अनुभव घेतला. त्यांना ही गोष्ट नक्कीच पटेल असे मला वाटते. मे २०१४ तारीख १५ रोजी मी एका एस.एस.सी पास वरासाठी वरासह वधू शोधीत होतो. दर

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:46+5:302014-09-12T22:38:46+5:30

भूतकाळात वधूशोध पहाणेचे काम चैत्र वैशाख या दोन महिन्यात धूम धडाक्यात चालूअसायचे. रस्ते नव्हते वाहणे नव्हती, पायवाटा तुडवून-तुडवून वर पक्षाच्या चपला तुटायच्या आणि पायांचे पारवे व्हायचे. वधू वयाने लहान असेल तरीही नाविलाजाने पंसती करायची वधूला वराकडून देणगी म्हणून धान्य-गुळाचे रवे आणिपैसे, कपडे देऊ करायचे आणि मग विवाह व्हायचे आता वर्तनामन काळ विज्ञानाचा सुखाचा समृद्धीचा चालूआहे. या काळाच्या सुरूवातीला वधूकडून वरास हुंडा रुपाने देणगी, पैसे, पेहरावा,गाडी घोडा म्हणेल ते द्यायचे आणि वधूवरांकडून पंसत व्हायची असाही काळ वीस एक वर्षे चालला. आणि इ।। सन २००० साल उजाडले आणि पूर्वपदावर काळ आला तो वधू शोधण्याचा ज्यांनी वधू शोधण्याचा अनुभव घेतला. त्यांना ही गोष्ट नक्कीच पटेल असे मला वाटते. मे २०१४ तारीख १५ रोजी मी एका एस.एस.सी पास वरासाठी वरासह वधू शोधीत होतो. दर

Bride Search (Folk) | वधू शोध (लोकमंच)

वधू शोध (लोकमंच)

तकाळात वधूशोध पहाणेचे काम चैत्र वैशाख या दोन महिन्यात धूम धडाक्यात चालूअसायचे. रस्ते नव्हते वाहणे नव्हती, पायवाटा तुडवून-तुडवून वर पक्षाच्या चपला तुटायच्या आणि पायांचे पारवे व्हायचे. वधू वयाने लहान असेल तरीही नाविलाजाने पंसती करायची वधूला वराकडून देणगी म्हणून धान्य-गुळाचे रवे आणिपैसे, कपडे देऊ करायचे आणि मग विवाह व्हायचे आता वर्तनामन काळ विज्ञानाचा सुखाचा समृद्धीचा चालूआहे. या काळाच्या सुरूवातीला वधूकडून वरास हुंडा रुपाने देणगी, पैसे, पेहरावा,गाडी घोडा म्हणेल ते द्यायचे आणि वधूवरांकडून पंसत व्हायची असाही काळ वीस एक वर्षे चालला. आणि इ।। सन २००० साल उजाडले आणि पूर्वपदावर काळ आला तो वधू शोधण्याचा ज्यांनी वधू शोधण्याचा अनुभव घेतला. त्यांना ही गोष्ट नक्कीच पटेल असे मला वाटते. मे २०१४ तारीख १५ रोजी मी एका एस.एस.सी पास वरासाठी वरासह वधू शोधीत होतो. दररोज ४ ते ५ गावे फिरून जीव मेटाकुटीस आला. जिथे जावे तिथे तीच परिस्थिती वधू पक्षाकडून वर पक्षास विचारणा व्हायची ती अशी, मुलग्याचे शिक्षण किती सरकारी नोकरी आहे का? शेती किती? भाऊ किती,, आरसीसी बंगला आहे का? फोर व्हीलर आहे का? वगैरे, वगैरे... वर पक्षांकडून जर का या सुविधा असतील तर मग दुसरे प्रश्न आमच्या मुलीचे शिक्षण बी.ए., बी. एड., बीएसस्सी, शेती डिप्लोमा, अशा डिग्री असून नोकरी लावणार का? आमची मुलगी शेती करणार नाही, घरी म्हैशी आहेत का? शेण-घाण काढणार नाही. अशा अटी मान्य असतील तर वराचा बायोडाटा (पत्रिका) ठेवा आणि अटी मान्य असल्याचे कळवा हे झाले मध्यम-उच्च थरातील वरांचे वधूंचे अता सामान्य वरांची कथा ज्याला शिक्षणच नाही त्याला मुली पाहण्याचे काम चालू करून चार वर्षे झाली. १० वी पास वराला १२ वी पास, एफवाय, एस वाय, मुली वधूवर सुचकांनी सुचविल्या त्या-त्या ठिकाणी वर पक्षाने जाऊन स्वत:चा पंचनामाच क रून घेतला. सध्या वधू वर सुचक फार झालेत त्यांची फि दहा हजार पर्यंत आहे आणि हे महाभाग ५० % रक्कम द्यायची आणि पसंती झाल्यावर ५०% रक्कम द्यायची या रुढींना कंटाळून मंडळी स्वत: फिरू लागली. अनुभव तेच आले. मी त्याच मालिकेत होतो. आणि फिरून फिरून आम्ही बेजार झालो. ४०-४५ किलो मीटरचा प्रवास करून थकलो होतो. आणि मुधाळति˜ा येथे हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी बसलो होतो. वेटरला ऑर्डर दिली. बाबा एक-एक मिसळ पाव आण...बाजूच्या टेबलवर चार-पाच माणसे बसली होती. त्यांचा चेहरा थकलेला होता. त्यातील एका जेष्ठ माणसाने मला विचारले महाराज कुण्या गावचं मी माझ नाव सांगून मिसळ पावचा एक तुकडा तोंडात टाकला आणि मी त्यांचे नाव गाव विचारले. ते म्हणाले वडींग पाडळीचे काय काम काढलसा विचारताच त्यांनी सांगितल. डेळे-चिवाळे गावी मुलगी पाहण्यासाठी गेलाो होतो. मुलगी पाहिली न्हाईहो पाहिली असती तर बरं... गावच्या वेशीपासून पाच गल्लया नाव विचारत विचारत घर शोधून काढलं आत येऊ का विचारलं एक वयोवृद्ध आबा घरातून बाहेर आले. आणि विचारल कोण पाहिजे. बाबा आम्ही कंटाळलेलो श्वास टाकीत म्हटलं, बाबा, तुम्हीच पाहिजे. या बसा पाणी आणून दिलं आणि विचारलं कुण्या गावचं, काय काम काढलसा, ताकाला जाऊन मोघा दडवायचे सोडून सांगून टाकले तुमची मुलगी बघायला आलोय आबा म्हणाले, आमच्यात मुलगी नाही. आमच्याच नातवालां दोन वर्षे मुलगी पाहतोय. मुलगीच मिळेनाहो... तोंडात मारल्यासारखे निरोप घेऊन परत आलो... महाराज काय करायचं थकलो हो.... हे ऐकताच आम्हाला ठसका लागला आणि घशातील घास नाकाकडून बाहेर आला. आहो.... महाराज पाणी प्या... म्हणताच. पाणी तर पितोच... पितो... पण आमचीही तीच परिस्थिती आहे. आम्हीही दोन महिने हेच करतोय. म्हणताच त्यानाही हसू आले. आणि सगळ्यांनी हासण्याचे फवारे उडविले.
- केरबा बळवंत नाईक, राधानगरी

Web Title: Bride Search (Folk)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.