शांघाय : जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (आयएमएफ) पर्याय म्हणून भारतासह सहा ब्रिक्स देशांनी १०० अब्ज डॉलरच्या भांडवलावर सुरू केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने (एनडीबी) मंगळवारपासून येथे कामकाज सुरू केले. ही नवी बँक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांना पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्यास प्रोत्साहन देताना त्यांच्या गरजांनुसार त्यांना सेवा उपलब्ध करून देईल. चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये एनडीबीचे मुख्यालय आहे. बँकेच्या उद््घाटन समारंभास चीनचे अर्थमंत्री लू जिवेई, शांघायचे महापौर यांग शियोंग व बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत उपस्थित होते. कामत हे बँकेचे पाच वर्षांसाठी अध्यक्ष असतील. ते म्हणाले, ‘‘लोकांच्या अपेक्षांनुसार ही बँक काम करील अशी मला आशा आहे. सगळ्याच देशांनी एकमेकांना खूप जवळून सहकार्य केले पाहिजे. आम्ही आमच्या सदस्य देशांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊ व त्यांच्या गरजांनुसार त्यांना सेवा देऊ.’’
लू यांनी बँकेच्या उद््घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात सांगितले की, एनडीबी उत्तमरीत्या काम करून सध्याच्या आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत पूरक म्हणून काम करील आणि संचालन व्यवस्थेला आणखी चांगले करण्याची शक्यताही पडताळून बघेल. ही बँक स्थापन करण्यामागचा उद्देशच या देशांत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि त्याच्या पुढच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा आहे. एनडीबीचे सुरुवातीचे भांडवल ५० अब्ज डॉलर असेल व काही वर्षांत ते वाढून १०० अब्ज होईल.
बँकेच्या प्रारंभीच्या भांडवलात प्रत्येक ब्रिक्स देशाचा समान वाटा असेल.
ब्रिक्स देशांच्या नव्या बँकेचा चीनमध्ये प्रारंभ
जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (आयएमएफ) पर्याय म्हणून भारतासह सहा ब्रिक्स देशांनी १०० अब्ज डॉलरच्या भांडवलावर सुरू केलेल्या
By admin | Updated: July 21, 2015 22:53 IST2015-07-21T22:53:20+5:302015-07-21T22:53:20+5:30
जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (आयएमएफ) पर्याय म्हणून भारतासह सहा ब्रिक्स देशांनी १०० अब्ज डॉलरच्या भांडवलावर सुरू केलेल्या
