मुंबई : गेल्या सहा व्यावसायिक सत्रांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण गुरुवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१६ अंकांनी वाढला. रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदाल्को आणि टाटा स्टील या कंपन्यांचे समभाग वाढल्याने सेन्सेक्सला बळ मिळाले.
सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर काल सेन्सेक्स तीन महिन्यांच्या नीचांकावर गेला होता. जीएसटी विधेयक संसदेत अडकल्यामुळे तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या भीतीमुळे बाजारांत घसरण सुरू होती. ग्राहकोपयोगी समभागांत खरेदीचा जोर वाढल्यानंतर गुरुवारी घसरणीला ब्रेक लागला.
सेन्सेक्स दिवसभर अत्यंत अस्थिर होता. सकाळी तो २५,१३६.७१ अंकांवर मजबुतीने उघडला होता. त्यानंतर तो २५,२८९.५८ अंकांपर्यंत वर चढला. या टप्प्यावर नफा वसुली सुरू झाली. त्यामुळे सेन्सेक्स घसरून नकारात्मक टापूत गेला. सत्राच्या अखेरीस २१६.२७ अंकांची अथवा 0.८६ टक्क्याने घसरून सेन्सेक्स २५,२५२.३२ अंकांवर बंद झाला. तत्पूर्वी, गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्स १,१३३.३६ अंकांनी घसरला होता.
व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७0.८0 अंकाने अथवा 0.९३ टक्क्याने वाढून ७,६८३.३0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ७,६९१.९५ आणि ७,६१0 अंकांच्या मध्ये हेलकावताना दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आज १९ नोव्हेंबर नंतरचा सर्वांत मोठा एकदिवसीय लाभ नोंदविला. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग चांगले वाढले.
डीएलएफ, एनबीसीसी यासारख्या कंपन्यांनी ३.२६ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली.
सहा दिवसांच्या घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स २१६ अंकांनी वाढला
गेल्या सहा व्यावसायिक सत्रांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण गुरुवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१६ अंकांनी वाढला.
By admin | Updated: December 10, 2015 23:34 IST2015-12-10T23:34:39+5:302015-12-10T23:34:39+5:30
गेल्या सहा व्यावसायिक सत्रांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण गुरुवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१६ अंकांनी वाढला.
