Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग दुसऱ्या सप्ताहात प्रमुख निर्देशांकांची पडझड

सलग दुसऱ्या सप्ताहात प्रमुख निर्देशांकांची पडझड

अमेरिकेतील व्याजदरांच्या वाढीबाबत असलेली अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरत्या खनिज तेलाच्या किमती,परकीय वित्तसंस्थांकडून झालेली

By admin | Updated: April 11, 2016 02:00 IST2016-04-11T02:00:46+5:302016-04-11T02:00:46+5:30

अमेरिकेतील व्याजदरांच्या वाढीबाबत असलेली अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरत्या खनिज तेलाच्या किमती,परकीय वित्तसंस्थांकडून झालेली

Breakdown of major indices for the second consecutive week | सलग दुसऱ्या सप्ताहात प्रमुख निर्देशांकांची पडझड

सलग दुसऱ्या सप्ताहात प्रमुख निर्देशांकांची पडझड

प्रसाद गो. जोशी 
अमेरिकेतील व्याजदरांच्या वाढीबाबत असलेली अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरत्या खनिज तेलाच्या किमती,परकीय वित्तसंस्थांकडून झालेली विक्री अशा विविध कारणांमुळे भारतातील शेअर बाजारात सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये घसरण झालेली दिसून आली.
अर्थसंकल्पानंतर बाजारात आलेली तेजी गेल्या दोन सप्ताहांमधील घसरणीमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये वाहून गेलेली दिसून येत आहे. मागील सप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५९६ अंशांनी खाली येऊन २४६७४ अंशांवर बंद झाला. यामधील घट २.४ टक्के एवढी राहिली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २.१ टक्कयांनी घसरून ७५५५ अंशांवर बंद झाला. सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये निर्देशांक घसरलेले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही अनुक्रमे ०.५ आणि ०.२३ टक्कयांनी घसरण झाली आहे.
रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेली घट ही अपेक्षेपेक्षा कमी असल्याने बाजारावर याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. या पतधोरणानंतर बाजारात घसरण झाली. याच जोडीला अमेरिकेतील व्याजदरांच्या वाढीबाबत जगभर साशंकता व्यक्त होत आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजार कमी झाले. याचा फटका भारतातील शेअर बाजारांनाही बसला आहे. याच जोडीला काही महत्वाच्या देशांची अर्थविषयक आकडेवारीही जाहीर झाली आहे. मात्र ही आकडेवारी फारशी आशादायक नसल्याने बाजारात उत्साह निर्माण होऊ शकला नाही.
मार्च महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांनी आक्रमकपणाने खरेदी केलेली दिसून आली. या संस्थांनी या महिन्यात २११४२.९२ कोटी रुपयांची खरेदी केली. मात्र गेल्या सप्ताहामध्ये या संस्थांनी विक्रीचा मार्ग अवलंबला. आधीच खाली येत असलेल्या बाजारातील घसरणीला यामुळे आणखीनच वेग आला. गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १३५२ कोटी रुपयांची विक्री केल्याचे सेबीने जाहीर केले आहे.
आगामी सप्ताहामध्ये केंद्र सरकारकडून फेब्रुवारी महिन्यासाठीची अर्थविषयक आकडेवारी तसेच औद्योगिक उत्पादनाबाबतची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. त्याचप्रमाणे विविध आस्थापनांचे चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर होण्यास प्रारंभ होणार आहे. इन्फोसिसच्या नेतृत्वाखाली आर्थिक निकाल जाहीर होण्यास प्रारंभ
होईल.

Web Title: Breakdown of major indices for the second consecutive week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.